Autoimmune Disorder And Vitamin D: ऑटोइम्यून डिसऑर्डर हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेल किंवा कुठे वाचला असेल. ही एक गंभीर स्थिती आहे. यात शरीराची इम्यूनिटी बाहेरील वायरसऐवजी आपल्याच सेल्स आणि टिश्यूंना आपला वैरी मानतात. विचार करा अशात शरीरात किती समस्या होतील. त्यामुळे ऑटोइम्यून डिसऑर्डर काय आहे आणि तो कशामुळे होतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण आजकाल या आजारांच्या भरपूर केसेस समोर येत आहेत.
प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, "शाळेत तुम्ही नक्कीच वाचलं असेल की, आपल्या शरीरात काही खास सेल्स म्हणजेच पेशी असतात, ज्या शरीरात येणाऱ्या वायरस किंवा बॅक्टेरियाला नष्ट करतात. ही एकप्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे. पण यात गडबड झाली तर शरीराचं नुकसान होतं".
ऑटोइम्यून डिसऑर्डर का होतो?
ऑटोइम्यून डिसऑर्डर (Autoimmune Disorder) होण्याचं मुख्य कारण व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. जास्तीत जास्त लोकांचा जास्त वेळ घरात किंवा ऑफिसमध्ये जातो. उन्हाच्या संपर्कात कमी राहत असल्यानं शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. अशात ऑटोइम्यून डिसऑर्डर सोबतच आरोग्यासंबंधी इतरही समस्यांचा धोका वाढतो.
ऑटोइम्यून डिसऑर्डरची लक्षणं
ऑटोइम्यून डिसऑर्डर झाल्यास किडनी, फुप्फुसं, हृदय आणि मेंदूसहीत कोणतेही अवयव प्रभावित होऊ शकतात. यामुळे सूज, स्नायूंमध्ये वेदना, कमजोरी, काविळ, खाज, श्वास घेण्यास अडचण, शरीरात पाणी जमा होणे अशीही लक्षणं दिसतात.
करू नका या चुका
जर तुम्ही तुमचं शरीर ९० टक्के झाकून ठेवत असाल किंवा उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे सनस्क्रीन लावत असाल तर यामुळे व्हिटॅमिन डी शरीरात पोहोचण्यास अडचण निर्माण होते. उन्हापासून बचाव करणं महत्वाचं आहेच, पण सोबतच व्हिटॅमिन डी मिळवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. असं आढळून आलं आहे की, सरासरी ४ पैकी ३ लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची करतरता असते.
शरीरातील कोशिकांच्या रिसेप्टर्समध्ये व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे. शरीराला आपल्या सेल्सच्या क्षमतेचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी व्हिडॅमिन डी ची गरज असते. तेव्हाच आपलं इम्यून सिस्टीम योग्यपणे काम करेल. तेव्हाच आपल्या शरीराचं डिफेन्स मेकॅनिझन मजबूत राहील आणि वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव होईल.