Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दंगल फेम 'बबिता'चं दुर्मिळ आजाराने निधन, डर्माटोमायोसिटिस नक्की असते काय? महिलांना असतो अधिक त्रास..

दंगल फेम 'बबिता'चं दुर्मिळ आजाराने निधन, डर्माटोमायोसिटिस नक्की असते काय? महिलांना असतो अधिक त्रास..

What is Dermatomyositis, rare condition that Dangal actress Suhani Bhatnagar succumbed to? : आमिर खान याच्या ऑनस्क्रिन मुलीचं निधन; मृत्यूचं कारण ऐकाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2024 12:14 PM2024-02-18T12:14:12+5:302024-02-18T12:15:37+5:30

What is Dermatomyositis, rare condition that Dangal actress Suhani Bhatnagar succumbed to? : आमिर खान याच्या ऑनस्क्रिन मुलीचं निधन; मृत्यूचं कारण ऐकाल तर...

What is Dermatomyositis, rare condition that Dangal actress Suhani Bhatnagar succumbed to? | दंगल फेम 'बबिता'चं दुर्मिळ आजाराने निधन, डर्माटोमायोसिटिस नक्की असते काय? महिलांना असतो अधिक त्रास..

दंगल फेम 'बबिता'चं दुर्मिळ आजाराने निधन, डर्माटोमायोसिटिस नक्की असते काय? महिलांना असतो अधिक त्रास..

बॉलीवूडमधील ब्लॉकबस्टर फिल्म 'दंगल' फेम (Dangal) ज्युनिअर बबिता (Babita) अर्थात सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचं निधन झालं. वयाच्या १९ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. ही धक्कादायक बातमी पसरताच बॉलीवूडसह चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तिला मुख्य ओळख दंगल या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटामध्ये तिने अभिनेता आमिर खान याच्या लेकीची भूमिका साकारली होती.

सुहानी हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे कमी वयात तिचं निधन कशामुळे झाले? औषधांच्या दुष्परिणामामुळे तिचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे, यामुळे मृत्यू ओढावते का?(What is Dermatomyositis, rare condition that Dangal actress Suhani Bhatnagar succumbed to?).

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहानी भटनागर डर्माटोमायोसायटिसने त्रस्त होती. या आजाराची लक्षणे सामान्य जरी वाटत असली तरी, हा आजार कधी धोकादायक बनेल सांगता येत नाही. सुहानीला ११ दिवसांपूर्वी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचण्यांमधून तिला डर्मेटोमायोसिसचा त्रास असल्याचे निदर्शनास आले. पण डर्मेटोमायोसिस हा आजार नेमका काय? पाहूयात.

डर्माटोमायोसिटिस एक दुर्मिळ आजार

मायो क्लिनिकच्या मते, डर्माटोमायोसिटिस हा एक दुर्मिळ आजार आहे. जो सामान्यतः पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतो. यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते. यावर उपाय म्हणून स्टिरॉइड्सचा वापर केला जातो. पण रोगप्रतिकारक शक्तीवर आणखी परिणाम होण्याचा धोका वाढतो. या आजारात पेशींमध्ये जळजळ होते, ज्यामुळे स्नायू झपाट्याने कमकुवत होऊ लागतात आणि त्वचेवर पुरळ उठतात.

कानात मळ झाला आहे? पिन-इअरबड्स घालू नका, पाहा ३ उपाय- बहिरेपणाचा धोका टाळा

डर्माटोमायोसिटिसची लक्षणे

या आजाराची लक्षणे लवकर किंवा खूप उशिरा दिसून येतात. पहिले लक्षण त्वचेतील बदलांपासून सुरू होते. त्वचा प्रथम व्हायलेट किंवा डस्की रंगात बदलू लागते. त्यामुळे त्वचेवर रॅशेस दिसू लागतात. हे पुरळ सहसा चेहऱ्यावर आणि डोळ्याभोवती दिसतात.

डर्माटोमायोसिटिसची कारणे

डर्माटोमायोसिटिसची लक्षणे ऑटोइम्यून डिसऑर्डरसारखेच असतात. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होतेच. शिवाय हा आजार हेल्दी टिश्यूवर हल्ला करतात. हा आजार होण्यामागे विषाणूचा संसर्ग, तीव्र सूर्यप्रकाश, काही औषधे आणि धूम्रपान ही कारणं कारणीभूत ठरतात.

डर्माटोमायोसिटिसमुळे होणारा त्रास

झोपण्यापूर्वी पाणी प्यावे का? किती प्यावे? तज्ज्ञ सांगतात, रात्री भरपूर पाणी पिऊन झोपत असाल तर..

डर्माटोमायोसिटिसमुळे अन्न प्राशन करण्यात अडचण येऊ शकते. यामुळे न्यूमोनियाचा धोका वाढतो. शिवाय श्वास घेण्यात देखील अडचण निर्माण होते. या स्थितीत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, फुफ्फुसाचे आजार आणि अगदी कर्करोगाचा धोका देखील वाढतो.

Web Title: What is Dermatomyositis, rare condition that Dangal actress Suhani Bhatnagar succumbed to?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.