Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ऑफिसात सतत ओव्हर टाइम करता,तासंतास कामच करता? तुम्हाला हार्ट ॲटॅकचा धोका आहे..

ऑफिसात सतत ओव्हर टाइम करता,तासंतास कामच करता? तुम्हाला हार्ट ॲटॅकचा धोका आहे..

What is Hustle Culture? How it affects your health हॅसल कल्चर म्हणजे नक्की काय? त्याचा आपल्या कामाशी आणि तब्येतीशी काय संबंध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 12:43 PM2023-03-02T12:43:28+5:302023-03-02T12:45:05+5:30

What is Hustle Culture? How it affects your health हॅसल कल्चर म्हणजे नक्की काय? त्याचा आपल्या कामाशी आणि तब्येतीशी काय संबंध?

What is Hustle Culture? How it affects your health | ऑफिसात सतत ओव्हर टाइम करता,तासंतास कामच करता? तुम्हाला हार्ट ॲटॅकचा धोका आहे..

ऑफिसात सतत ओव्हर टाइम करता,तासंतास कामच करता? तुम्हाला हार्ट ॲटॅकचा धोका आहे..

सध्याच्या स्पर्धेच्या दुनियेत कित्येक जण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करीत आहे. यश मिळवण्यासाठी धक्के खात आपापल्या क्षेत्रात जागा निर्माण करीत आहे. स्पर्धा इतकी वाढली आहे की, बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे लोकं स्वतःला अपडेट ठेवत, अंगभूत कौशल्य वाढवत आहे. सध्या ओव्हरटाईम ट्रेण्डमध्ये आहे. प्रत्येक जण अधिक काम करून, कामात नाव कमवत आहे. मात्र, यामुळे लोकांना शारीरिक व मानसिक आरोग्यावरील दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

ओव्हरटाईम करण्याच्या या ट्रेण्डला हॅसल कल्चर असेही म्हणतात. या कल्चरचा थेट परिणाम कार्डियोवैस्कुलर हेल्थवर होतो. ज्यामुळे व्यक्तीला हृदयाच्या संबंधित आजाराला सामोरे जावे लागते.

यासंदर्भात, न्युज १८ या वेबसाईटवर माहिती देताना, नवी दिल्लीचे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वनिता अरोरा सांगतात, ''हॅसल कल्चरचा नकारात्मक परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. यात लोकं वर्किंग टाईमपेक्षाही अधिक काम करतात. ज्यामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. या स्थितीत हृदयविकाराचा धोका वाढतो. जेव्हा आपण तणावाखाली असतो, तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये वाईट परिणाम होतो, ज्यामुळे रक्तपुरवठा खंडित होण्याचा धोका वाढतो''(What is Hustle Culture? How it affects your health).

स्ट्रेस कार्डिओमायोपॅथीचा धोका अधिक

डॉ. वनिता अरोरा यांच्या मते, ''हॅसल कल्चरमध्ये लोकांना जास्त ताण येतो. तणावामुळे अनेक लोक कार्डिओमायोपॅथीचे शिकार होतात. या स्थितीत हृदयाचे स्नायू कमकुवत होतात व हृदयाचे कार्य कमी होऊ लागते. दरम्यान, तणाव कमी करण्यात आपण जर यशस्वी झालात तर, या समस्येपासून मुक्तीही मिळू शकते. मात्र, यासाठी योग्य वेळी हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.''

वर्क आणि पर्सनल लाईफ वेगळे ठेवा

कार्डिओलॉजिस्टच्या मते, ''हॅसल कल्चर ही कॉर्पोरेट आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची संस्कृती आहे. ज्यात प्रत्येकाने त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवणे आवश्यक आहे. जर आपण आपला सगळा वेळ व्यावसायिक कामात घालवलात तर, वैयक्तिक आयुष्यासोबतच तुमचे आरोग्यही बिघडू शकते. यासाठी आपण व्यावसायिक काम ठराविक वेळेत करावे, आणि पर्सनल लाईफला वेळ द्यावे. ज्यामुळे आपले आरोग्य सुधारेल.''

महिलांना थायरॉईडचा त्रास जास्त, कसे ओळखाल की आपल्याला थायरॉईडचा त्रास होतोय? डॉक्टर सांगतात...

ऑफिसचे काम घरात आणू नका

डॉ.वनिता यांच्या मते, ''कॉर्पोरेट जगतात खूप स्पर्धा आहे. बॉस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एकमेकांशी स्पर्धा करायला लावतात, कामगिरीच्या दबावामुळे लोक ऑफिसचे काम घरी आणतात. त्यामुळे घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टीमध्ये व्यक्ती अडकून जातो. जास्त काम करून तुम्ही व्यावसायिक जीवनाच्या स्पर्धेत जरी जिंकलात तरी, वैयक्तिक आयुष्यात खूप काही गमवाल.''

Web Title: What is Hustle Culture? How it affects your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.