Join us   

चांगली झोप होऊनही सकाळी फ्रेश वाटत नाही- कामाचा आळस येतो? बघा हे मॉर्निंग डिप्रेशन तर नाही ना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2024 3:02 PM

What Is Morning Depression: रात्री पूर्ण, शांत झोप होऊनही सकाळी उठण्याचा, कामं करण्याचा आळस येत असेल तर हे नक्की वाचा... (symptoms and reasons of morning depression)

ठळक मुद्दे कधीतरी अधूनमधून सकाळी उठल्यानंतर आळस येत असेल तर तो मॉर्निंग डिप्रेशनचा प्रकार नाही. पण वारंवार असं होत असेल तर मात्र त्यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

सकाळी उठणं, पटापट आवरणं आणि आपापल्या कामाला लागणं असं रुटीन थोड्याफार फरकाने प्रत्येकाचंच असतं. सकाळी उठून काेणती कामं करायची, हे वेगवेगळं असलं तरी दिवस सुरू झाल्यावर प्रत्येकाचंच काही ना काही कामकाज सुरू होतं. काही लोक सकाळी उठल्यानंतर एकदम उत्साहाने, आनंदाने कामाला लागतात. त्यांना पाहूनच आपल्याला फ्रेश वाटतं. पण त्याउलट काही लोक मात्र रात्रभर झोपूनही दुसऱ्यादिवशी सकाळी आळसावलेलेच दिसतात (symptoms and reasons of morning depression). त्यांना ना अंथरुणातून उठावं वाटतं ना काही काम करावं वाटतं. तुम्हालाही असंच होत असेल आणि याशिवाय पुढे सांगितलेली काही लक्षणंही जाणवत असतील तर तो मॉर्निंग डिप्रेशनचा एक भाग असू शकतो. (what is morning depression)

 

मॉर्निंग डिप्रेशनचा त्रास का होतो?

मॉर्निंग डिप्रेशनचा त्रास का होतो याविषयी आजतकने दिलेल्या वृत्तात असं सांगितलं आहे की काही अभ्यासकांच्या मते जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कॉर्टीसॉल हार्मोन जास्त असेल तर त्याला मॉर्निंग डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो. जेव्हा आपली स्ट्रेस लेव्हल वाढलेली असते तेव्हा शरीरात कॉर्टीसॉल हार्मोनचं प्रमाण वाढतं.

पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला

ज्या लोकांना ऑफिसचा किंवा करिअरचा ताणतणाव सांभाळता येत नाही, त्यांच्यामध्ये मॉर्निंग डिप्रेशन आढळून येतं. शिवाय रात्री झोपताना जास्त वेळ फोन बघणे, मद्यपान, धुम्रपान यामुळेही मॉर्निंग डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो. कधीतरी अधूनमधून सकाळी उठल्यानंतर आळस येत असेल तर तो मॉर्निंग डिप्रेशनचा प्रकार नाही. पण वारंवार असं होत असेल तर मात्र त्यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

 

मॉर्निंग डिप्रेशनची लक्षणं 

१. सकाळी अंथरुणातून उठण्याची इच्छाच न होणं

२. सकाळी उठल्याउठल्या एनर्जी एकदमच कमी झाल्यासारखं वाटणं.

मुलांच्या डब्यासाठी युनिकॉर्न, डोरेमॉनच्या टिफिन बॅग घ्यायच्या? बघा मुलांना आवडणारे ३ आकर्षक पर्याय

३. सकाळची कोणतीच कामं करण्याची इच्छा न होणं.

४. उठल्यानंतर काही तास स्वत:वर किंवा इतरांवर चिडचिड होणं.

५. खूप आळस येणं आणि पुन्हा झोपण्याची इच्छा होणं.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समानसिक आरोग्य