Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

आजकाल सोशल मीडिया आणि हेल्थ एक्सपर्ट्समध्ये एक नवीन ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो म्हणजे 'पिलो थेरपी'. त्याच्या मदतीने लोक त्यांच्या वेदनांपासून मुक्त होत आहेत. त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:02 IST2025-04-24T17:01:45+5:302025-04-24T17:02:22+5:30

आजकाल सोशल मीडिया आणि हेल्थ एक्सपर्ट्समध्ये एक नवीन ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो म्हणजे 'पिलो थेरपी'. त्याच्या मदतीने लोक त्यांच्या वेदनांपासून मुक्त होत आहेत. त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया...

what is pillow therapy know its benefits for mental relief and stress | मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

ऑफिसमधील कामाचं प्रेशर असो किंवा कोणी मन दुखावलं असो... सर्वकाही खूप वेदनादायक असतं. यातून दिलासा मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. अशा परिस्थितीत, एक छोटीशी साथीदार काहीही न बोलता तुम्हाला दिलासा देऊ शकते, ती म्हणजे उशी... आजकाल सोशल मीडिया आणि हेल्थ एक्सपर्ट्समध्ये एक नवीन ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो म्हणजे 'पिलो थेरपी'. त्याच्या मदतीने लोक त्यांच्या वेदनांपासून मुक्त होत आहेत. त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया...

पिलो थेरपी म्हणजे काय?

पिलो थेरपीची कल्पना खूप सोपी आहे. तुम्ही एक मऊ उशी घ्या, ती घट्ट धरा, तिला मिठी मारा आणि तुम्हाला हवे असेल तर ओरडा, रडा, किंवा तुमचे मन मोकळे करा, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते म्हणा. हे Emotional Venting मानलं जाते. ही थेरपी स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि भावना मोकळ्या करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. चित्रपटांमध्ये अनेक वेळा तुम्ही अभिनेते किंवा अभिनेत्रीला उशीला मिठी मारून रडताना पाहिलं असेल. ही पिलो थेरपी आहे, जी खूप प्रभावी मानली जाते.

हेल्थ एक्सपर्ट्स काय म्हणतात?

हेल्थ एक्सपर्ट्स म्हणतात की, कधीकधी आपल्याकडे असं कोणी नसतं ज्याच्याशी आपण मोकळेपणाने बोलू शकतो. अशा परिस्थितीत, पिलो थेरपी आपल्यासाठी  सुरक्षित आहे, जिथे आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. ओरडल्याने डायफ्राम आणि कोर मसल्स एक्टिव्ह होतात, ज्यामुळे ताण कमी होतो. हे इमोशनल रीबूट बटणासारखे काम करतं, जे नकारात्मक विचार घालवतं.

पिलो थेरपीचे फायदे

- ऑफिसमधील स्ट्रेस कमी होतो.

-  चांगली झोप लागते.

- ब्रेकअप किंवा रिलेशनशिप ट्रोमामधून आराम मिळतो.

- प्रियजनांवर राग काढण्याऐवजी उशीवर राग काढल्याने नातं वाचतं.

- तुम्ही तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करू शकता.

- भावना दाबून ठेवण्याची गरज नाही.

- मानसिक ताण कमी होतो.

पिलो थेरपी कशी करायची? 

- जिथे तुम्ही एकटे असाल अशी शांत जागा निवडा.

- एक मऊ उशी घ्या जिला तुम्ही मिठी मारू शकता.

- तुमच्या भावना अगदी मोकळेपणाने व्यक्त करा, मग तो राग असो किंवा ओरडणं.

- जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उशीशी बोलू शकता.

- हळूहळू शांत व्हा आणि दीर्घ श्वास घ्या.
 

Web Title: what is pillow therapy know its benefits for mental relief and stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.