एक गरम चाय की प्याली हो...! चहा म्हटलं की, अनेकांच प्रेमच. हल्ली चहाचे देखील अनेक प्रकार पाहायला मिळतात. गुळाचा, साखरेचा, आल्याचा... आपल्यापैकी अनेकजण सकाळच्या दिवसाची सुरुवात चहा- कॉफीने करतात.(Best time to drink coffee or tea) सकाळचा चहा म्हणजे दिवसभर शरीरात एनर्जी टिकवून ठेवणं. आळस, झोप किंवा कंटाळा आला की आपल्या जिभेवर चहाची चव रेंगाळू लागते. (Health benefits of coffee and tea)
अनेकांना दिवसभरात चहाच आणि तर कॉफी देखील प्यायल्या आवडते.(Acidity and bloating solutions with tea) दिवसभरात इतके वेळा चहा-कॉफी पितात की, अनेक आजार ओढावून घेतात. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटात ॲसिड रिफ्लेक्स होते. यामुळे ॲसिडीटीची समस्या वाढू शकते.(Tea and coffee for digestion) पण आपण कधी विचार केला आहे का? चहा आणि कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती? चहा आणि कॉफी योग्य वेळी प्यायल्याने आरोग्याला फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यायले तर...
1. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटात आम्ल तयार होते. ज्यामुळे आम्लपित्त आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.
2. सकाळी लवकर कॅफिनचे सेवन केल्याने शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.
3. सकाळी शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी जास्त असते. जी शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. चहा आणि कॉफी प्यायल्याने कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होऊ लागते.
4. सकाळी रिकाम्या पोटी कॅफिनचे सेवन केल्याने हाडे कमकुवत होतात. तसेच मेंदूवर थेट परिणाम होतो.
5. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने छातीत जळजळ होते.
चहा- कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी उठल्यावर सर्वात आधी ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या. हे शरीराला डिटॉक्स करायला आणि पचनसंस्था सक्रिय करायला मदत करते. नाश्ता केल्यानंतर ३० ते ४५ मिनिटांनी चहा किंवा कॉफी प्या. यामुळे पोटावर जास्त दबाव पडणार नाही. तसेच पचनसंस्था निरोगी राहिल. जर आपल्याला काम करताना चहा-कॉफी प्यायची असेल किंवा झोप उडवायची असेल तर सकाळी ९ ते ११ दरम्यान आपण चहा पिऊ शकतो. यावेळी शरीरातील कोर्टिसोलची पातळी सामन्य होण्यास सुरुवात होते.
या गोष्टी लक्षात ठेवा.
1. ॲसिडीटी टाळण्यासाठी चहा आणि कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करा.
2. चहा आणि कॉफीमध्ये जास्त साखर घालणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. शक्य असल्यास साखरेशिवाय चहा आणि कॉफी प्या.
3. सकाळी दुधाचा चहा प्यायल्याने पोट जड वाटते. त्यासाठी हर्बल टी, लिंबू पाणी किंवा ब्लॅक टी प्या.
4. दिवसभरात २ ते ३ कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नका. झोपेवर परिणाम होऊ शकतो.