Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बदाम-बडीशेप-खडीसाखरेची १ चमचा पावडर रोज खाण्याचे ४ फायदे, उपाय सोपा-लाभ मोठा

बदाम-बडीशेप-खडीसाखरेची १ चमचा पावडर रोज खाण्याचे ४ फायदे, उपाय सोपा-लाभ मोठा

What is the benefits of almond saunf mishri : करायला एकदम सोपा उपाय पण तब्येतीसाठी अत्यंत गुणकारी ठरणारी खास पावडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2023 05:00 PM2023-09-14T17:00:50+5:302023-09-14T17:02:46+5:30

What is the benefits of almond saunf mishri : करायला एकदम सोपा उपाय पण तब्येतीसाठी अत्यंत गुणकारी ठरणारी खास पावडर

What is the benefits of almond saunf mishri? | बदाम-बडीशेप-खडीसाखरेची १ चमचा पावडर रोज खाण्याचे ४ फायदे, उपाय सोपा-लाभ मोठा

बदाम-बडीशेप-खडीसाखरेची १ चमचा पावडर रोज खाण्याचे ४ फायदे, उपाय सोपा-लाभ मोठा

निरोगी आरोग्य हवं असेल तर, उत्तम आहार घेणं गरजेचं आहे. फळे, भाज्या, डाळी, कडधान्य खाल्ल्याने शरीराला अनेक जीवनसत्वे आणि पौष्टीक घटक मिळतात. याशिवाय आपण आपल्या डाएटमध्ये ड्रायफ्रुट्सचा देखील समावेश करतो. ड्रायफ्रुट्समध्ये अनेक प्रकार आहेत. त्यात आपण बदाम जास्त प्रमाणात खातो.

तज्ज्ञ रोज एक बदाम खाण्याचा सल्ला देतात. बदामामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते. यासह अनेक पोषक घटक आढळतात. काही जण बदाम भिजवून खातात. पण आपण बदाम, बडीशेप आणि खडीसाखरेसोबत खाऊ शकता. बदाम, बडीशेप आणि खडीसाखरची पावडर दररोज खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात(What is the benefits of almond saunf mishri?).

पचन सुधारते

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, जर आपल्याला गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी पचनाच्या निगडीत त्रास होत असेल तर, बदाम, बडीशेप आणि खडीसाखरेची पावडर तयार करून खा. रोज एक चमचा पावडर खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. पचनाच्या संबंधित त्रास कमी होतो.

चहा पिण्यापूर्वी खा या ४ पैकी कोणतीही १ गोष्ट, चहा जास्त प्यायला तरी पित्त वाढणार नाही

वेट लॉसमध्ये मदत

बदाम, बडीशेप आणि खडीसाखरेची पावडर खाल्ल्याने अतिरिक्त चरबी कमी होते. बदामामुळे लवकर भूक लागत नाही. यासह प्रोटीन मिळते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. बदाम, बडीशेप आणि खडीसाखरेची पावडर नियमित खाल्ल्याने फरक लवकर दिसून येईल.

डोळ्यांसाठी फायदेशीर

बदाम, बडीशेप आणि खडीसाखर डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. हे मिश्रण रोज खाल्ल्याने दृष्टी सुधारते. यासाठी रोज रात्री बदाम, बडीशेप, खडीसाखर एकत्र मिक्स करून त्याची पावडर तयार करा. व ही पावडर दुधात मिक्स करून रोज रात्री प्या.

त्वचेसाठी फायदेशीर

बदाम, बडीशेप, खडीसाखरेची पावडर नियमित खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. ही पावडर खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. याचा थेट परिणाम त्वचेवरही दिसून येतो. ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.

सांधेदुखी असेल तर कोबी ठरते फायदेशीर, ४ सोपे उपाय - सांधेदुखीचा त्रास होईल कमी

बदाम, बडीशेप, खडीसाखरेची पावडर कशी तयार करायची?

बदाम, बडीशेप, खडीसाखरेची पावडर आपण घरी तयार करू शकता. यासाठी समप्रमाणात बदाम, बडीशेप, आणि खडीसाखर घ्या. या सर्वांची पावडर तयार करा. व जेवणापूर्वी चमचाभर पावडर खा. किंवा जेवल्यानंतर रात्री दुधात पावडर मिसळून प्या. रात्री झोपण्यापूर्वी दुधात पावडर मिसळून प्यायल्याने अधिक फायदा होतो.

Web Title: What is the benefits of almond saunf mishri?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.