Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > एक मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा, 5 आजार राहतील लांब

एक मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा, 5 आजार राहतील लांब

What is the benefits of jaggery and chickpeas? हृदय राहील निरोगी - हाडांना मिळेल मजबुती, फक्त रोज सकाळी मुठभर चणे - गुळ खायला विसरू नका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2023 06:57 PM2023-06-25T18:57:04+5:302023-06-26T18:51:13+5:30

What is the benefits of jaggery and chickpeas? हृदय राहील निरोगी - हाडांना मिळेल मजबुती, फक्त रोज सकाळी मुठभर चणे - गुळ खायला विसरू नका..

What is the benefits of jaggery and chickpeas? | एक मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा, 5 आजार राहतील लांब

एक मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा, 5 आजार राहतील लांब

शरीर सुदृढ व मजबूत राहण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे. असे अनेक पदार्थ आहेत, ज्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आजकालच्या बैठी जीवनशैली व लोकांच्या आळशीपणामुळे लोकांमध्ये पूर्वीसारखी उर्जा व ताकद राहिलेली नाही. लगेचच थकवा येतो. थोडं काम केल्यानंतर थकवा का येतो? याचा विचार आपण कधी केला आहे का? थकवा घालवण्यासाठी आपण चणे व गुळाचे सेवन करू शकता.

चणे कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असतात, तर गूळ लोह आणि पोटॅशियमसारख्या घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, या दोन गोष्टींच्या नियमित सेवनाने अनेक आजार टाळता येतात. चणा व गुळाच्या सेवनाने आरोग्याला कोणते फायदे मिळतात, याबाबतीत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ रोहित यादव यांनी माहिती दिली आहे(What is the benefits of jaggery and chickpeas?).

गुळ - चणे खाण्याचे ५ भन्नाट फायदे

हाडे मजबूत होतात

शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी गुळ आणि चणे खाण्याचा सल्ला मिळतो. चण्यामध्ये आढळणारे कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तिशीत हाडे ठिसूळ होतात, असे होऊ नये म्हणून गुळ - चणे खा. याचे नियमित सेवन केल्याने हाडांसह इतरही आजार दूर होतात.

रोज नियमित २ खजूर खाण्याचे १० फायदे, तूप घालून खा किंवा तसेच-खजूर आहारात हवेतच

हृदय निरोगी राहते

हृदय निरोगी ठेवण्यासाठी गुळ - चणे उपयुक्त ठरते. गुळ - चण्यामध्ये आढळणारे पोषक तत्व हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. तज्ज्ञही ते खाण्याचा सल्ला देतात.

वजन कमी करते

चण्यामध्ये प्रोटीन आढळते. गुळ - चणे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. आपण सकाळी गुळ - चणा खाऊ शकता.

पचनशक्ती वाढवते

चणे आणि गूळ पचनशक्ती निरोगी ठेवण्यास मदत करते. या दोन गोष्टी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. या दोन्ही गोष्टी समान प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

सतत होणारे मूड स्विंग्ज टाळा, खा ५ गोष्टी- सतत मूड जा-ये करणार नाही- वाटेल एनर्जेटिक

अॅनिमियावर उपाय

अनेक समस्यांमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीत नियमित चणे आणि गुळ खा. चणे आणि गुळामध्ये लोह पुरेशा प्रमाणात आढळते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

Web Title: What is the benefits of jaggery and chickpeas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.