Join us   

रोज स्वच्छ घासूनही दात पिवळेच दिसतात? ५ सोपे उपाय, दात दिसतील पांढरेशुभ्र-होतील स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 4:20 PM

What is the best thing to whiten teeth : दात पिवळे पडले असतील तर चारचौघात हसताना किंवा बोलताना फार विचार करावा लागतो.

जेव्हा दातांची काळजी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा डेंटिस्टवर अवलंबून न राहता घरीच दातांची स्वच्छता करायला हवी. आपल्याच निष्काळजीपणामुळे दात किडणं, हिरड्यांमध्ये वेदना, तोंडाचा दुर्गंध येणं असे त्रास उद्भवतात. रोजच्या काही सवयी बदलल्या तर दात स्वच्छ राहण्यास मदत होईल. (Teeth whitening) पांढरेशुभ्र स्वच्छ दात आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात.

दात पिवळे पडले असतील तर चारचौघात हसताना किंवा बोलताना फार विचार करावा लागतो. (Teeth whitening at home in 2 minutes)  एक-एक दातासाठी ३ ते ६ हजार रूपये घालवावे लागतात. अशा स्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहिले तर तुमचं काम अधिक सोपं होऊ शकतं. (What is the best thing to whiten teeth)

दिवसातून दोनवेळा ब्रश करा

आपले  दात नेहमीच चमकदार दिसावेत असं तुम्हाला वाटत असेल तर दातांची स्वच्छ नियमित  करायला हवी.  एक्सपर्ट्नुसार सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याआधी दात ब्रशने व्यवस्थित घासा. यामुळे बॅक्टेरियाज जास्त तयार होणार नाहीत.

जेवल्यानंतर गुळण्या करा

जेवल्यानंतर दातांमध्ये अन्नाचे कण अडकलेले असतात ते बाहेर निघणं खूप आवश्यक असतं. अन्यथा दात जास्त किडू लागतात. हे टाळण्यासाठी  काहीही खाल्ल्यानंतर गुळण्या करा.

संत्र्याचे साल

संत्र्याप्रमाणेच केळीचे साल ही दातांचा पिवळेपणा दूर करते. यासाठी ब्रश केल्यानंतर संत्र्याच्या सालीच्या पावडरनं दातांवर हळूवार मसाज करा यामुळे दातांचा पिवळा थर निघण्यास मदत होईल.

बेकींग सोडा

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी चुटकीभर बेकींग सोडा  टुथपेस्टवर लावून ब्रश करा. यामुळे दातंचा पिवळेपणा दूर होईल. आठवड्यातून  एक ते २ वेळा हा उपाय करा.

डेंटल फ्लॉसचा वापर

जेवल्यानंतर फळं, भाज्या,  दातांमध्ये अडकतात  जे टुथपिक्सने बाहेर निघत नाही. तुम्ही डेंटल फ्लॉसचा वापर करू शकता. हे धाग्यापासून तयार झालेले असते. जे दातांच्या मध्ये जाऊन दात स्वच्छ करतात आणि घाण सहज बाहेर काढतात. रोजच्या काही सवयी दातांना कमकुवत बनवतात. त्यासाठी नेहमी चांगल्या सवयी ठेवा. जसं की सोडा, ड्रिंक्स, दारू पिणं, स्मोकींग टाळा, जास्त गोड खाऊ नका, यामुळे आरोग्याचं नुकसान होतं.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य