Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नाश्ता-दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण वाट्टेल तेव्हा करता? १ चूक पडते महागात, तज्ज्ञ सांगतात..

नाश्ता-दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण वाट्टेल तेव्हा करता? १ चूक पडते महागात, तज्ज्ञ सांगतात..

What is the best time to eat breakfast, lunch, and dinner? हेल्दी पदार्थ चुकीच्या वेळेत खाल्ले तरी शरीराला पौष्टीक घटक मिळणार नाहीत कारण आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2023 06:55 PM2023-11-09T18:55:07+5:302023-11-09T18:55:48+5:30

What is the best time to eat breakfast, lunch, and dinner? हेल्दी पदार्थ चुकीच्या वेळेत खाल्ले तरी शरीराला पौष्टीक घटक मिळणार नाहीत कारण आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात..

What is the best time to eat breakfast, lunch, and dinner? | नाश्ता-दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण वाट्टेल तेव्हा करता? १ चूक पडते महागात, तज्ज्ञ सांगतात..

नाश्ता-दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण वाट्टेल तेव्हा करता? १ चूक पडते महागात, तज्ज्ञ सांगतात..

जीवनाची धावपळ पोटासाठी असते. पण धावपळीच्या या जीवनात प्रत्येकाला आरोग्याकडे लक्ष द्यायला जमत नाही. मुख्य म्हणजे आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश कमी होतो. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. जर आपण हेल्दी पदार्थ चुकीच्या वेळेत खात असाल तरी देखील आपण आजारी पडू शकता. सकस आहार खाल्ल्यानंतरही आपल्याला मधुमेह, बीपी, कोलेस्ट्रॉल, अपचन यांसारखे आजार होऊ शकतात. सकस आहार योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने न खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेहमी वेळेवर नाश्ता, लंच आणि डिनर करावे.

अन्नातील पोषक घटक जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढेच खाण्याची योग्य वेळही महत्त्वाची आहे. दिवसाचा आहार कधी आणि केव्हा खावा याची माहिती आरोग्य तज्ज्ञ वरलक्ष्मी यनमंद्र यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओद्वारे शेअर केली आहे(What is the best time to eat breakfast, lunch, and dinner).

आरोग्य तज्ज्ञ वरलक्ष्मी यनमंद्र यांच्या मते, 'आयुर्वेदानुसार जेवण ३ भागात करावे. दिवसाचा पहिला भाग कफ प्रधान असतो (६ ते १०), दिवसाचा दुसरा भाग पित्त प्रधान असतो (१० ते २) तर दिवसाचा तिसरा भाग वात प्रधान असतो (२ ते ६).'

कोण म्हटलं मिठाईमुळे फक्त वजन वाढतं? या दिवाळीत बिनधास्त खा ६ प्रकारच्या मिठाई, आरोग्यासाठी उत्तम

नाश्ता

आयुर्वेदानुसार, ६ ते १० ही कफ प्रधान वेळ असते. याच वेळेत नाश्ता करावा. या काळात आपली पचनक्रिया मंदावते. यामुळे या काळात पौष्टीक, हलके आणि हेल्दी पदार्थ खावे. जड अन्न खाणं टाळावे.

लंच

सकाळी १० ते दुपारचे २ हा काळ पित्त प्रधान असतो. या काळात पचनशक्ती वाढलेली असते. आपण या काळात जड आणि पौष्टीक अन्न खाऊ शकता. या काळात खाल्ले जाणारे पदार्थ लगेच पचतात. शिवाय पचनक्रियेतही कोणतेही अडचण येत नाही. दुपारचे जेवण नेहमी पोट भरून करावे. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

डिनर

आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करायला हवे. यावेळी पचनशक्ती कमी होते. ज्यामुळे रात्रीच्या वेळेस हलके पदार्थ खावे. कमीत कमी ८ वाजण्यापूर्वी जेवण करावे. रात्रीच्या जेवणासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी ६ ते ८. यावेळेत हलके पदार्थ खा. जे पचनास हलके असतात.

Web Title: What is the best time to eat breakfast, lunch, and dinner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.