आपलं शरीर एक असा भाग आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज असतात विशेष म्हणजे रोज स्वच्छता ठेवल्यानंतरही शरीराच्या काही भागांवर बॅक्टेरियाजा वाढत जातात. आपण खाणंपिणं व्यवस्थित असेल पण वैयक्तीक स्वच्छतेची काळजी घेतली तर तर याचा नकारात्मक परिणाम होतो. लोक रोज अंघोळ करताना आणि शरीराच्या केसांना स्वच्छ ठेवण्यासाठी साबण, बॉडी वॉश आणि शॅम्पूचा वापर करातात. शरीरावर असेही काही भाग आहेत जे आपण साफ करताना दुर्लक्ष करतो. साफसफाई करूनही शरीराचे काही भाग स्वच्छ राहतात. (What Is The Dirtiest Part Of Our Body House Of Thousands OF Bacteria Fact)
२०१२ मध्ये PLOS One मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार अभ्यासात असे की केवळ आपल्या नाभीमध्ये २३६८ प्रकारचे जीवाणू आहेत. यापैकी १५४८ प्रजाती वैज्ञानिकांसाठी नवीन आहेत. या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त घाम येतो आणि ते पोकळ असल्यामुळे ते साफ करणे सोपे नसते. त्यामुळेच या भागात दुर्गंधी आणि बॅक्टेरिया वाढतात.
विज्ञान सांगते की नाभी ही खरं तर शरीरावर झालेली जखम आहे. जन्मावेळी मूल आईपासून वेगळे झाल्यावर ही जखम तयार होते. नाभीची गुंडाळी बहुतेक आतील बाजूस असते. क्वचितच कोणाची नाळ बाहेर असते यामुळे नुकसानही होते.
टोरंटोमधील डीएलके कॉस्मेटिक त्वचाविज्ञान आणि लेझर क्लिनिकमधील त्वचाशास्त्रज्ञांच्या मते, नाभी हे जीवाणूंसाठी एक प्रजनन भूमी आहे. तुमचे वजन जास्त असेल किंवा टाइप २ मधुमेह असल्यास नाभीकडे अधिक लक्ष द्यायला हवे. नाभी स्वच्छ करण्यासाठी वॉशक्लोथचा वापर केला जाऊ शकतो. जो कोमट पाण्यात आणि साबणाच्या पाण्यात बुडवून वापरला जाऊ शकतो. नाभीत कधी खाज आली, नाभी लाल झाली, दुखत असेल, दुर्गंधी येत असेल तर काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचा संसर्ग वाढण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
नाभी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
बेली बटन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. बेली बटनवर माईल्ड सोप किंवा बॉडी वॉश लावा त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नाभी क्लिन करण्यासााठी तुम्ही कॉटन बड्सचा वापर करू शकता. क्लिनिंगनंतर बेली बटनमध्ये नारळाचे तेल घाला.