Join us   

९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने कॉटन बड्स वापरून कान स्वच्छ करतात, डॉक्टर सांगतात-बहिरे व्हाल कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 2:27 PM

Is It Safe To Clean Ear Using Cotton Buds?: कान स्वच्छ करताना तुमचंही काही चुकत नाही ना हे एकदा तपासून घ्या...(what is the proper method of cleaning ear using cotton buds?)

ठळक मुद्दे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की खरं तर कानाच्या आतल्या भागातली स्वच्छता करण्यासाठी कानामध्ये काहीही घालण्याची गरज नसते.

कानात बऱ्याचदा मळ साचतो. तो स्वच्छ करण्यासाठी आपण बाजारात विकत मिळणारे कॉटन बड्स वापरतो आणि ते कानात घालून कानातला मळ काढण्याचा प्रयत्न करतो. काडी किंवा इतर कोणतीही टोकदार वस्तू कानात घालण्यापेक्षा हे बरं असं आपल्याला वाटतं. अनेक महिला तर त्यांच्या लहान मुलांचे कान स्वच्छ करण्यासाठीही काॅटन बड्स वापरतात (is it safe to clean ear using cotton buds?). पण असं करणं खरंच योग्य आहे का, कान स्वच्छ करण्याची ही पद्धत खरोखरच योग्य आहे का याविषयी बघा डॉक्टरांनी सांगितलेली ही खास माहिती...(what is the proper method of cleaning ear using cotton buds?)

 

कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत काेणती?

कॉटन बड्स वापरून कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी डॉक्टरांनी दिलेली माहिती ajabgajabofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

कधी विचार केला रेस्टॉरंटमधल्या प्लेट्स, वाट्या नेहमी पांढऱ्या रंगाच्याच का असतात? बघा खास कारण....

यामध्ये डाॅक्टर असं सांगत आहेत की कानातला मळ स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स थेट कानामध्ये घालणं अतिशय चुकीचं आहे. कॉटन बड्सचा उपयोग केवळ कानाचा बाह्य भाग स्वच्छ करण्यासाठी करावा. ते कधीही कानाच्या आता घालू नये.

मस्त देसी जुगाड! पुरण, डाळ कुकरमध्ये शिजवताना शिट्टी होताच पाणी बाहेर येतं? करा 'ही' ट्रिक...

डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की खरं तर कानाच्या आतल्या भागातली स्वच्छता करण्यासाठी कानामध्ये काहीही घालण्याची गरज नसते. कारण कानामध्ये जी नलिका असते त्या नलिकेतले केस बाहेरच्या दिशेने वळालेले असतात. त्यामुळे कानात येणाऱ्या कोणत्याही कणांना ते सगळ्यात आधी आत येण्यापासून रोखतात.

 

आपल्या कानाच्या नलिकेतून एक चिकट पदार्थ स्त्रवत असतो. या पदार्थामध्ये जेव्हा बाहेरची धूळ, घाण अडकते त्याला आपण कानातला मळ असं म्हणताे. हा मळ एखादी टोकदार वस्तू कानात घालून काढून टाकण्याची गरज नसते.

साडीच्या प्रकारानुसार निवडा साडी पिन! परफेक्ट साडी पिन निवडण्यासाठी पाहा ५ सुंदर ट्रेण्डी डिझाईन्स..

कारण नलिकेतल्या केसांद्वारे तो आपोआपच बाहेर फेकला जातो. तो फक्त ओल्या फडक्याने पुसून घ्यावा. जर कान दुखत असेल, कानात मळाचा खडा झाला असं वाटत असेल तर मनानेच कॉटन बड्स किंवा इतर कोणतीही वस्तू घालून तो स्वच्छ करू नका. डॉक्टरांकडूनच कान साफ करून घ्या. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स