Join us   

ताक पिण्याची योग्य वेळ कोणती-दिवसाला किती ताक प्यावं? चांगल्या तब्येतीसाठी आहारतज्ज्ञ सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:25 PM

Benefits Of Drinking Spiced Buttermilk Recipe : ऊन्हाळ्याच्या दिवसांत ताकाचे सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पेय पदार्थांचा आहारात समावेश करतो ताकाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते. (Buttermilk Drink) ताकातून शरीराला बरीच पोषक तत्व मिळतात यात व्हिटामीन ए, बी, सी आणि व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे इम्यूनिटी वाढण्यासही मदत होते. (What Is The Right Time To Drink Buttermilk in Summer)

ऊन्हाळ्याच्या दिवसांत ताकाचे सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. (How Much Buttermilk Drink in A Day) ताकात जर तुम्ही काळी मिरी, जिरं, मिरचीची पेस्ट मिसळली तर ताक हे सुपर ड्रिंक बनते. (Benefits Of Drinking Spiced Buttermilk Recipe)

ऊन्हाळ्याच्या दिवसांत ताक पिण्याची योग्य वेळ कोणती? (Is Buttter Milk Good For You or Not)

ऊन्हाळ्याच्या दिवसांत तुम्ही कधीही ताक पिऊ शकता. पण दुपारच्या जेवल्यानंतर किंवा जेवताना ताक पिणं तब्येतीसाठी अधिक फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री ताकाचे सेवन करू शकता. 

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

दिवसभरात किती ताक प्यावे? (Amazing Health Benefits Of Buttermilk)

कोणताही पदार्थ असो तो योग्य प्रमाणात खाल्ल्याने किंवा प्यायल्यानेच शरीराला बरेच फायदे मिळतात. एका व्यक्तीने ऊन्हाळ्याच्या दिवसांत कमीत कमी १ ते २ ग्लास पाणी प्यायला हवं. जास्त प्रमाणात ताक प्यायल्याने गॅस पोटदुखी, पोट खराब होणं, ब्लोटींग अशा समस्या उद्भवू शकतात. रिकाम्यापोटी ताकाचे सेवन केल्यास शरीराच्या इलेक्ट्रोलाईट्वर परिणाम होतो. शरीरात एनर्जी  बुस्ट होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

आहारतज्ज्ञ सांगतात की दही एक उत्तम प्रोबायोटिक आहे. ज्यामुळे आतडे निरोगी राहण्यास आणि बॅक्टेरियाजचे संतुलन चांगले राहण्यास मदत होते. यात प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटामीन बी कॉम्पलेक्स जास्त प्रमाणात असते. दह्यात पाणी मिसळून पातळ केल्याने ताक तयार होते. यामुळे शरीराला पोषक वातावरण मिळते. काही मसाले घातल्याने अधिक फायदे मिळतात. 

ताकाच्या सेवनाचे फायदे (Health Benefits Of ButterMilk)

ताकाचे सेवन केल्यानं पचनक्रिया मजबूत राहते, एसिडिटीपासून आराम मिळतो, गॅस, एसिडीटी, अपचनाच्या समस्येपासून आराम मिळतो, ब्लोटींगपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता. हाडं आणि मांसपेशींना मजबूत बनवण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. शरीरात उष्णता टिकून राहण्यास मदत होते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते, इम्यूनिटी मजबूत राहते, वजन कमी होण्यासही मदत होते, शरीर हायड्रेट राहते, ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते. 

टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य