Join us   

२० मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायल्याने महिलेचा मृत्यू? पाणी पिण्याचा अतिरेकही ठरेल जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2023 11:47 AM

What is water toxicity? Indiana mom, Ashley Summers, dies after drinking too much water जास्त पाणी प्यायल्यामुळे पोटात तयार झाले विष, काही मिनिटात महिलेचा झाला मृत्यू

'जल ही जीवन है', असं म्हटलं जातं. पाण्यामुळे संपूर्ण सृष्टी चालते. पाणी प्यायल्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. यासह शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यासाठी तज्ज्ञ दररोज २ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण अतिप्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरात गंभीर परिणाम होतात का? तर याचं उत्तर आहे 'हो'. 'अति तेथे माती' ही म्हण प्रत्येक गोष्टीसाठी लागू होते. एका महिलेबाबतीतही तसंच काहीसं घडलं आहे.

इंडियाना स्थित एका महिलेचा जास्त पाणी प्यायल्याने मृत्यू झालाय. यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण वाटू शकतं, पण २० मिनिटात ४ लिटर पाणी प्यायल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. कोण आहे ती महिला? पाणी जास्त प्यायल्यामुळे खरंच मृत्यू होतो का? हे पाहूयात(What is water toxicity? Indiana mom, Ashley Summers, dies after drinking too much water).

यांसंदर्भात, हेल्थ अँड यू च्या संस्थापक पोषणतज्ज्ञ काजल भथेना सांगतात, “पाणी हेच जीवन आहे, त्याला तुमच्या मृत्यूचे कारण बनवू नका. शरीराला जितक्या पाण्याची गरज आहे, तितकेच प्या.''

कोणतं तेल सतत आहारात असेल तर कोलेस्टेरॉल वाढतं? कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणतं तेल योग्य?

नक्की घडलं काय?

इंडियाना स्थित ॲश्ले नावाची ही महिला पती आणि दोन मुलांसह वीकेंड ट्रीपसाठी गेली होती. ट्रीपच्या दुसऱ्या दिवशी तिची तब्येत बिघडू लागली. सुरूवातीला ॲश्ले हिला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला, मळमळ, उलटीचा त्रास यासह डोकं देखील दुखू लागलं होतं. शरीर हायड्रेट करण्यासाठी अवघ्या काही मिनिटांतच तिनं २ लीटर पाणी संपवलं.

त्यानंतर ॲश्लेने केवळ २० मिनिटांत पाणीच्या ४ बाटल्या संपवल्या. एवढं पाणी प्यायल्याने ॲश्ले हिची तब्येत बिघडू लागली. ती अचानक जमीनीवर कोसळली , तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिची तब्येत सतत बिघडत गेल्याने डॉक्टरांनी तिला ICU मध्ये हलवलं. मेंदूला सुज आल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. पाण्यात सोडियम नसल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला.

वॉटर टॉक्सिसिटी म्हणजे काय?

कमी वेळात गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, किंवा किडनीमध्ये अधिक पाणी जमा होणे, याला वॉटर टॉक्सिसिटी असे म्हणतात. याला वॉटर इनटॉक्सिकेशन किंवा वॉटर पॉयझनिंग देखील म्हटले जाते. या स्थितीत ओव्हरहायड्रेशनमुळे रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ लागतो. खूप जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने त्यातील इलेक्ट्रोलाइट्स पाण्यात डायल्यूट होतात. व शरीरात सोडियम डेफिशियन्सीमुळे मृत्यू होतो.

नखं सांगतात आजारांची लक्षणं, तपासा तुमची नखं-पाहा तुम्ही आजारी तर नाही.

वॉटर टॉक्सिसिटीची लक्षणं?

वॉटर टॉक्सिसिटी मुळे मळमळ, डोकेदुखी, उलट्या, स्नायूंमध्ये पेटके येणे, थकवा, हाय ब्लड प्रेशर, श्वास घेण्यास अडचण अशी लक्षणे जाणवू लागतात. व गंभीर प्रकरणांमध्ये सेंट्रल नर्व्हस डिसफंक्शन, कोमा, फेफरं येणं, ब्रेन डॅमेज यासारखी लक्षणे दिसतात. हा त्रास वाढला तर, मृत्यू देखील होऊ शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य