Join us   

What items cause cancer : रोजच्या वापरातल्या ४ गोष्टींमुळे होऊ शकतो जीवघेणा कॅन्सर, डॉक्टर सांगतात की.....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 12:12 PM

How can you reduce your risk of getting cancer :

कॅन्सरच्या आजाराचं नाव ऐकताच मनात भितीची स्थिती निर्माण होते. कारण शेवटच्या स्टेजला या आजाराचे निदान झाल्यास कधीही मृत्यू येऊ शकतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण दैनंदीन वापरातील काही वस्तू कॅन्सरचं कारण ठरू शकतात. (These common items in your kitchen could cause cancer) आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी अलिकडेच आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये अशा काही वस्तू दाखवल्या आहेत. ज्यांच्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. जर तुम्हीही रोजच्या वापरात या वस्तूंचा समावेश करत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं. (How can you reduce your risk of getting cancer)

एल्यूमिनियम फॉईल

जेवण गरम राहण्यासाठी एल्यूमिनियम फॉईल्सचा वापर केला जातो. यात एल्यूमिनियम जेवणात काही प्रमाणात मिसळले जाते आणि ते जेवणाला विषारी बनवते. शरीरात एल्यूमिनियमचं जास्त प्रमाण हाडं, मासपेशी आणि इतर पेशींसाठी धोकादायक ठरू शकतात. याव्यतिरिक्त अल्जायमर, किडनीचे आजार यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. 

किचन लंच बॉक्स, टूल्स

बिस्फेनॉल ए (बीपीए) हे एक रसायन आहे जे प्लास्टिकला कडक करण्यासाठी वापरले जाते. प्लास्टिक पिण्याचे डबे, जेवणाचे डबे आणि खाद्यपदार्थांचे डबे यासारखी उत्पादने तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.  ज्यामुळे पेशींचा प्रसार, अपोप्टोसिस किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो.

 'या' कारणांमुळे उद्भवतात प्रायव्हेट पार्ट्समध्ये त्रासदायक पुळ्या; कारणं, उपाय समजून घ्या

टि बॅग्स

चहाच्या पिशव्यांमध्ये सामान्यतः नॅनो प्लास्टिक, पीसीव्ही, फूड ग्रेड नायलॉन असते. जेव्हा या चहाच्या पिशव्या गरम पाण्यात बुडवल्या जातात तेव्हा ही संयुगे पाण्यात तुटू लागतात. कागदी चहाच्या पिशव्या काहीवेळा एपिक्लोरोहायड्रिनसह एकत्र होतात आणि एक कार्सिनोजेन सक्रिय करतात.

नॉन स्टिक भांडी

काही स्वयंपाकघरातील भांड्यांमध्ये 'फॉरएव्हर केमिकल्स' असतात, ज्याला परफ्लुओक्टेन सल्फेट असेही म्हणतात. या रसायनांमुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. ही रसायने कुकींगच्या आणि औद्योगिक उत्पादनांमध्ये आढळतात जसे की नॉन-स्टिक कुकवेअर, वॉटरप्रूफ कपडे, साफसफाईची उत्पादने आणि शॅम्पू.

टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्सआरोग्य