नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्टेरॉल फक्त हृदयासाठीच नाही तर इतर अवयवांसाठीही हानीकारक ठरतं. लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्यात बदल करून तुम्ही यावर नियंत्रण ठेवव शकता. डाएटमध्ये कोणते पदार्थ समाविष्ट केल्यास कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या टाळता येते ते पाहूया. (Top 5 lifestyle changes to improve your cholesterol)
रोजच्या आहारात बदल केला तर घातक कॉलेस्ट्रेरॉल कमी करणं सोपं होऊ शकतं. याशिवाय रक्तात जमा झालेले फॅट्सही कमी होऊ शकतात. यासाठी एलडीएल कमी करणाऱ्या खाद्यपदार्थाचा आहारात समावेश करायला हवा. (Health 5 best foods to lower cholesterol fast for good heart health eat oats beans nuts)
१) हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार कोलेस्टेरॉल की करण्यासाठी आहारात ओट्सचा समावेश करा. ओट्समध्ये भरपूर फायबर्स असते. त्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्याला दूध, केळीबरोबर तुम्ही ओट्स खाऊ शकता.
२) बीन्समध्ये सोल्यूबल फायबर देखील मुबलक प्रमाणात आढळते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच पोट भरलेले ठेवण्याचे काम करते आणि दीर्घकाळ भरलेले वाटते. यासाठी राजमा, मसूर, काळे मटार इत्यादींचा आहारात समावेश करावा.
स्मृती इराणींनी बिल गेट्सना खिचडी बनवायला शिकवली; अन् व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....
३) बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि सर्व ड्रायफ्रूट्स हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे. जर तुम्ही दररोज 2 ड्रायफ्रुट्सचे सेवन केले तर तुमचे खराब कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रित केले जाऊ शकते. इतकंच नाही तर यामध्ये असलेले पोषक तत्व हृदयाला निरोगी ठेवण्यासही मदत करतात.
४) सोयाबीनपासून तयार झालेले पदार्थ जसं की, सोया दूध, टोफू, इत्यादी देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. जर तुम्ही दररोज 25 ग्रॅम सोयाचे सेवन केले तर ते खराब कोलेस्ट्रॉल 5 ते 6 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल.