Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचा गॅप असावा? वाचा काय म्हणाले एक्सपर्ट...

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचा गॅप असावा? वाचा काय म्हणाले एक्सपर्ट...

Health Tips : दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर ठेवलं नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:05 IST2025-01-20T11:02:34+5:302025-01-20T11:05:11+5:30

Health Tips : दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर ठेवलं नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

What should be ideal gap between lunch and dinner? | दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचा गॅप असावा? वाचा काय म्हणाले एक्सपर्ट...

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचा गॅप असावा? वाचा काय म्हणाले एक्सपर्ट...

Health Tips : सामान्यपणे लोक रोज ३ वेळ जेवण करतात. सकाळी, दुपारी आणि रात्री. या तिन्ही जेवणाच्या वेळा आपल्या आरोग्यावर खोलवर प्रभाव करत असतात. एक्सपर्टनुसार, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर ठेवलं नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात प्रश्न हा आहे की, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यात किती तासांचं अंतर असायला हवं? चला जाणून घेऊ.

प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल म्हणाल्या की, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ४ ते ६ तासांचा गॅप असणं आयडिअल मानलं जातं. या अंतरानं अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी पचन तंत्राला पुरेसा वेळ मिळतो आणि मेटाबॉलिज्म सक्रिय राहतं. जर हा गॅप खूप कमी किंवा जास्त झाला तर यानं पचन आणि शरीराची एनर्जी लेव्हल प्रभावित होते. 

योग्य गॅप न ठेवण्याचे नुकसान

१) पचन तंत्रावर प्रभाव

जर लंच म्हणजे दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे रात्रीच्या जेवणात जास्त गॅप होत असेल तर पोटात अ‍ॅसिडिटी, गॅस आणि अपचन अशा समस्या होऊ शकतात. तेच, गॅप कमी ठेवला तर पचन तंत्राला अन्न पचनास पुरेसा वेळ मिळत नाही. ज्यामुळे पोटात जडपणा जाणवू शकतो आणि पोट फुगू शकतं.

२) वजन वाढण्याचा धोका

दोन जेवणातील गॅपच्या चुकीच्या वेळेमुळे शरीराला एक्स्ट्रा भूक लागू शकते, ज्यामुळे लोक अनहेल्दी स्नॅक्स किंवा जंक फूड खातात. या सवयीमुळे वजन वाढण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो.

३) ब्लड शुगर असंतुलन

लंच आणि डिनरमध्ये योग्य अंतर न ठेवल्यानं ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होऊ शकते. जे डायबिटीसच्या रूग्णांसाठी घातक ठरू शकतं.

४) झोपेवर प्रभाव

रात्रीचं जेवण फार उशीरा केल्यानं पचन क्रिया स्लो होते, ज्यामुळे झोपेची क्वालिटी बिघडू शकते. हे नेहमीच होत असेल तर तणाव आणि थकवा जाणवू शकतो.

योग्य गॅप ठेवण्याच्या टिप्स

- लंचनंतर ४ ते ६ तासांनी डिनर करावं.

- जर गॅप मोठा झाला तर मधे हलकं आणि पौष्टिक स्नॅक्स खाऊ शकता. जसे की, फळ, नट्स किंवा दही.

- रात्रीचं जेवण संतुलित आणि हलकं कराव. ज्यात फायबर आणि प्रोटीन भरपूर असावं.

- रात्रीचं जेवण झोपण्याच्या २ ते ३ तास आधी करावं.

Web Title: What should be ideal gap between lunch and dinner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.