Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री झोपण्याआधी काय खाल्लं तर सकाळी पोटही साफ होईल आणि दिवसभर वाटेल फ्रेश!

रात्री झोपण्याआधी काय खाल्लं तर सकाळी पोटही साफ होईल आणि दिवसभर वाटेल फ्रेश!

Healthy Dinner Habits : सकाळी झोपेतून उठल्यावर होणाऱ्या या समस्या रात्रीच्या काही खाण्यामुळेही होतात. अशात या समस्या होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:44 IST2025-04-23T12:54:17+5:302025-04-23T17:44:26+5:30

Healthy Dinner Habits : सकाळी झोपेतून उठल्यावर होणाऱ्या या समस्या रात्रीच्या काही खाण्यामुळेही होतात. अशात या समस्या होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत.

What should be the last thing to eat after dinner to wake up fresh | रात्री झोपण्याआधी काय खाल्लं तर सकाळी पोटही साफ होईल आणि दिवसभर वाटेल फ्रेश!

रात्री झोपण्याआधी काय खाल्लं तर सकाळी पोटही साफ होईल आणि दिवसभर वाटेल फ्रेश!

Healthy Dinner Habits : प्रत्येकालाच आपल्या दिवसाची सुरूवात एनर्जीने आणि फ्रेश करायची असते. पण बऱ्याच लोकांची तक्रार असते की, सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना थकवा जाणवतो, डोकं दुखतं आणि पोटात जडपणा वाटतो. जास्तीत जास्त लोकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असते. जर सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसही चांगला जात नाही. सकाळी झोपेतून उठल्यावर होणाऱ्या या समस्या रात्रीच्या काही खाण्यामुळेही होतात. अशात या समस्या होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत.

रात्री झोपण्याआधी काय खावं?

जर तुम्ही रोज रात्री जेवणानंतर आणि झोपण्याआधी बडीशेप खाण्याची सवय लावली तर तुम्हाला वरील कोणत्याही समस्या होणार नाहीत. रात्री बडीशेप खाऊन झोपल्यानं काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.

पचन चांगलं होतं

बडीशेप पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी खूप फायदेशीर असते. बडीशेपच्या छोट्या छोट्या दाण्यांमध्ये गॅस्ट्रिक एंझाइम्स असतात, जे पचनास मदत करतात. त्यामुळे जेवण झाल्यावर थोडीशी बडीशेप खाल तर पचनक्रिया चांगली होईल. तसेच रात्री गॅस, अॅसिडिटी किंवा जडपणा अशा समस्याही होणार नाहीत.

झोप चांगली लागेल

पोट जर हलकं अशेल आणि पचन चांगलं झालं तर झोपेची क्वालिटी सुद्धा सुधारते. बडीशेपमध्ये मॅग्नेशिअम असतं. स्नायू सुद्धा रिलॅक्स राहतात. यामुळे झोप चांगली लागते. रात्री जर झोप चांगली झाली तर सकाळी तुम्हाला फ्रेश वाटतं.

पोट साफ होतं

रात्रीच्या जेवणानंतर जर बडीशेपचं दाणे खाल्ले तर आतड्या अॅक्टिव राहतात आणि पचनक्रिया चांगली होते. याचा प्रभाव सकाळी दिसतो. रात्री पचनक्रिया चांगली झाली तर सकाळी पोटही सहजपणे साफ होतं. ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटतं आणि फ्रेशही वाटतं.

तोंडाची दुर्गंधी जाते

रात्री बडीशेप खाऊ झोपल्यानं तोंडाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. बडीशेपमध्ये नॅचरल अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे तोंडाची दुर्गंधी दूर करतात आणि बॅक्टेरिया नष्ट करतात.

Web Title: What should be the last thing to eat after dinner to wake up fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.