Join us   

तुमचंही मूल मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही? पालकांनो टाळा ४ चुका; मुलांच्या वाढीचा प्रश्न..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 2:18 PM

What Should I Do if My Baby Doesn't Want to Eat? : मुलांना खरंच भूक लागत नाही? नक्की खरं काय? मूल जेवताना नखरे का करतात?

लहान मुलांना हाताळणे सोपे नसते (Parenting Tips). पालक झाल्यानंतर खांद्यावर बरीच जबादारी येतात (Eating Tips). त्यात मुलांचं करणंही आलंच. काही पालक हे वर्किंग असतात (Health Tips). त्यामुळे मुलांकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मुलांच्या पालनपोषणाकडे नकळत दुर्लक्ष होते. ज्यामुळे अनेकदा मुल जेवताना नखरे करतात.

अशा वेळी पालकांना जेऊ घालणं कठीण वाटतं. त्याच वेळी जबरदस्तीने मुलांना खाऊ घातले तर, मुल रडायला लागते. मुलांना जेऊ घालताना नक्की कोणत्या गोष्टी टाळाव्या? मुल जेवताना नखरे करत असतील तर, कशा पद्धतीने त्यांना हाताळायचं? याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. सांची रस्तोगी यांनी दिली आहे(What Should I Do if My Baby Doesn't Want to Eat?).

मुलांना खायला घालताना कोणत्या चुका टाळाव्या?

मुलाला जबरदस्तीने खाऊ घालणे

आपण ज्यापद्धतीने ३ वेळचं अन्न खातो, त्याचपद्धतीने मुल ३ वेळ जेवण करेल असं नाही. ते काही वेळेस कमी, तर काही वेळेस जास्त प्रमाणात खातात. काही दिवस ते सर्व प्रकारचे पदार्थ खातात. तर काही दिवस एक वेळच जेवतात. त्यामुळे जेवताना त्यांना कधीही जबरदस्ती करू नका. त्यांच्या आवडीनुसार पौष्टीक पदार्थ खायला द्या. शिवाय अन्नाचे महत्व पटवून द्या.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

विविध पदार्थ खायला द्या

मुलासाठी पदार्थ तयार करताना, आकर्षक पदार्थ तयार करा. जेणेकरून मुलांना याची सवय होईल. फक्त पालकची भाजी न देता, आपण त्यांना पालक पुरी, पालक राईस किंवा पालक डाळ पदार्थ तयार करून देऊ शकता. जेणेकरून ते आवडीने खातील.

स्नॅक्स देणे टाळा

मुलं जेव्हा काहीही खाण्यास नकार देतात, तेव्हा पालक त्यांना स्नॅक्स देतात. जे अत्यंत चुकीचे आहे. आपण मुलांना स्नॅक्स ऐवजी घरगुती पदार्थ खायला देऊ शकतात. पौष्टीक पदार्थांचेही स्नॅक्स आपण त्यांना खायला देऊ शकता. असे केल्याने मुलांची स्नॅक्स खणायची सवय सुटेल.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

मुलांसोबत न खाणे

अनेकदा मुलांना एकटे जेऊ वाटत नाही. आई - वडिलांसोबत जेवल्याने त्यांना अर्थात ते २ घास एक्स्ट्रा खाऊ शकतात. पालकांसोबत जेवल्याने मुल आवडीने जेवणाचं ताट संपवेल यात काही शंका नाही. 

टॅग्स : पालकत्वहेल्थ टिप्सआरोग्य