Join us   

चहा पिण्यापूर्वी खा या ४ पैकी कोणतीही १ गोष्ट, चहा जास्त प्यायला तरी पित्त वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2023 4:46 PM

What should I eat before drinking tea : चहा खूप होतो, मग पित्त खवळतं, ते टाळायचं तर करुन पाहा सोपा उपाय

चहाप्रेमींना सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम, चहा पिण्याची तलफ लागते. सकाळी चहा नाही मिळाला तर, संपूर्ण दिवस कंटाळवाण्यात जातो. पण चहा पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. अनेकदा चहा प्यायल्यानंतर लोकांना अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होते. यासह अनेक आरोग्याच्या निगडीत समस्या निर्माण होतात.

पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा सांगतात, 'चहामध्ये असलेले कॅफीन कंपाऊंड अॅसिड वाढवते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीराचे पीएच संतुलन बिघडते. ज्यामुळे अपचन आणि छातीत जळजळ सुरू होते'(What should I eat before drinking tea?).

चहा पिण्याचे नुकसान

जास्त चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता भासू लागते. यासह स्ट्रेस, अस्वस्थता, झोप न लागणे, मळमळ, छातीत जळजळ, डोकेदुखी, चक्कर येणे, कॅफिनचे व्यसन यांसारख्या दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते.

सांधेदुखी असेल तर कोबी ठरते फायदेशीर, ४ सोपे उपाय - सांधेदुखीचा त्रास होईल कमी

चहा पिण्याच्या २० मिनिटं करा एक काम

न्यूट्रिशनिस्ट सांगतात, 'चहा उपाशी पोटी पिऊ नका, त्याआधी अर्धे सफरचंद किंवा भिजवलेले काजू खा. याचे पीएच अल्कलाइन असते, जे पोटातील अॅसिड सामान्य ठेवण्यास मदत करते. त्यामुळे चहा पिण्यापूर्वी सफरचंद आणि काजू खाल्ल्याने गॅस, अपचन आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास कमी होतो. सफरचंद किंवा काजू खाल्ल्यानंतर २० मिनिटांनी चहा प्यावा.'

चहा पिण्यापूर्वी भिजवून खा ४ ड्रायफ्रुट्स

बदाम

मनुका

अक्रोड

फोर्टिफाइड धान्य म्हणजे नेमकं काय? कडकड वाजणारी हाडं ही धान्य खाऊन बळकट होतात?

काजू

बदाम अक्रोड खाण्याचे फायदे

भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला प्रोटीन आणि फायबर मिळते. यामुळे लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, क्रेविंग्स, इत्यादी समस्यांपासून सुटका मिळते. अक्रोडमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असते. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

मनुके आणि काजू खाण्याचे फायदे

भिजवलेले मनुके खाल्ल्याने पोटातील अॅसिड कमी होते. तसेच त्यातील आयर्न आणि व्हिटॅमिन बीमुळे अॅनिमियाची समस्या कमी होते. यात फायबरचे प्रमाण अधिक आढळते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. काजूमध्ये हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य