प्रत्येकाच्या घरात कोळी हा सापडतो. कालांतराने कोष्टी आणि त्याने विणलेललं जाळं कोपऱ्यात आढळून येतंच. त्यामुळे घरात धूळ आणि जाळं दिसून येतं. मात्र, हेच कोष्टी आपल्या शरीरासाठी किती धोकादायक आहे, याची कल्पना तुम्हाला आहे का ? साधारणपणे, लहान कोळी कमी विषारी असतात, त्यामुळे ते सहजपणे चावत नाहीत, परंतु मोठे कोळी प्रचंड विषारी असतात. ते सहजासहजी मरत देखील नाही.
ब्लैक विडो स्पाइडर आणि ब्राउन रेक्ल्यूज स्पाइडर आपल्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत. अशा प्रकारचे कोष्टी चावल्यामुळे त्वचेवर लालसरपणा, खाज सुटणे आणि सूज येऊ शकते. अशा समस्येपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती उपाय स्पायडर बाईटवर फायदेशीर ठरू शकतात, ज्याचे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. चला जाणून घेऊया या घरगुती उपायांबद्दल.
कोळी चावल्यावर काय करावे ?
स्टाइल क्रेझ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, स्पायडर चावल्याने त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे तीव्र वेदना आणि जागा लालसर देखील होऊ शकते. काही लोकांना कोळी चावल्यावर चक्कर येणे, पेटके येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी समस्या उद्भवते.
कोल्ड कॉम्प्रेस किंवा आइस पॅक
स्पायडरने चावा घेतल्यानंतर सूज आणि वेदना होते. त्यावर बर्फ वेदनाशामक म्हणून काम करू शकतात. कोल्ड पॅक प्रभावित भागात वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. कोल्ड कॉम्प्रेससाठी आइस पॅकचा वापर केला जाऊ शकतो. बाधित भागावर १५ मिनिटे चोळल्याने आराम मिळतो.
कोरफड जेल
एलोवेरा जेलमध्ये दाहक-विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. हे स्पायडर चावण्याशी संबंधित सूज आणि संसर्ग कमी करण्यास मदत करतात. सर्वप्रथम बोटांच्या मदतीने प्रभावित भागात एक चमचा कोरफड जेल लावा. त्यानंतर हळू हळू ५ मिनिटे मसाज करा. काही दिवसात आराम मिळेल.
बेकिंग सोडा
खाज आणि सूज कमी करण्यासाठी बेकिंग सोडा हा एक नैसर्गिक उपाय आहे. कोळी चावल्यावर संक्रमण टाळण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरेल. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून प्रभावित भागावर लावल्यास फायदा होऊ शकतो. कमीतकमी 10 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.