तुम्ही कधी नीट पाहिलं आहे की आपली जीभ कशी दिसते? पाहा मोठ्ठा आ करुन एकदा, जीभ स्वच्छ दिसते की त्यावर पांढरे पिवळे थर आहेत. गुलाबीसर आहे की पांढरट दिसते? नीट लक्ष दिले तर आपल्याला होणाऱ्या पचनाच्या त्रासापासून ते थेट आपल्याला असणाऱ्या व्हिटामिन्सच्या कमतरतेपर्यंत अनेक गोष्टींचे संकेत जिभेचा रंग देत असतो.
कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आर.के मूंदड़ा सांगतात, ''जिभेचा रंग आपल्या शरीरातल्या घडामोडींनुसार बदलतो. शरीरातील लक्षणे जिभेवर दिसून येतात. जेव्हा शरीरात आवश्यक व्हिटॅमिनची कमतरता भासते, तेव्हा जिभेवर सर्वात आधी चिन्हे दिसू लागतात. जर जिभेवरील रंग बदलत असेल तर त्वरित, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा''(What the Color of Your Tongue Says About Your Health).
जिभेचा रंग लाल होतो
जीभ सहसा गुलाबी रंगाची असते. मात्र, जिभेचा रंग लाल होत असेल म्हणजे तोंड आलं असेल तर तर तुमच्या शरीरात बी व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. ज्यामुळे जीभ लाल, खडबडीत व सुजल्यासारखी दिसते.
कळत - नकळत दररोज साखरेचं सेवन करता? १४ दिवस साखर सोडून पाहा, किती बदल होतो तब्येतीत
जिभेवर जखमा
जिभेला जर जखमा असतील, यासह खाणे, पिणे आणि अन्न गिळण्यास त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
जिभेवर पांढरे डाग
पांढऱ्या जिभेला जिओग्राफिक जीभ असेही म्हंटले जाते. मुख्यतः डिहायड्रेशनमुळे जीभ पांढरी पडू शकते. याशिवाय यीस्ट इन्फेक्शन देखील असू शकते. पांढरी जीभ साधारण लहान मुले आणि वृद्धांमध्ये अधिक दिसून येते. याशिवाय जिभेवर पांढरा लेप ल्युकोप्लाकियामुळेही होऊ शकतो. तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये ही समस्या अधिक निदर्शनास येते.
रक्तवाहिन्यांचे काम उत्तम चालावे म्हणून खा ५ सुपर फुड्स, रक्ताभिसरण होईल चांगले आणि शरीर धडधाकट
जीभ पिवळी पडणे
अनेकदा जिभेचा रंग पिवळा पडतो. तोंडात बॅकटेरियाची संख्या वाढल्याने ही समस्या उद्भवते. धुम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करत असाल तर, जीभ पिवळी पडू शकते. सोरायसिस किंवा अगदी दुर्मिळ घटनेत कावीळ झाल्यास जीभ पिवळी पडते.