Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज उपाशीपोटी ४ काजू खाण्याचे फायदे, काँस्टीपेशन ते हाडांचा कमकुवतपणा - उत्तम उपाय

रोज उपाशीपोटी ४ काजू खाण्याचे फायदे, काँस्टीपेशन ते हाडांचा कमकुवतपणा - उत्तम उपाय

What Time To Eat Cashews Is Healthiest? काजू खाण्याचे काही फायदेही असतात, पण नेमके केव्हा खावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2023 02:33 PM2023-07-16T14:33:15+5:302023-07-16T14:34:08+5:30

What Time To Eat Cashews Is Healthiest? काजू खाण्याचे काही फायदेही असतात, पण नेमके केव्हा खावे?

What Time To Eat Cashews Is Healthiest? | रोज उपाशीपोटी ४ काजू खाण्याचे फायदे, काँस्टीपेशन ते हाडांचा कमकुवतपणा - उत्तम उपाय

रोज उपाशीपोटी ४ काजू खाण्याचे फायदे, काँस्टीपेशन ते हाडांचा कमकुवतपणा - उत्तम उपाय

काजू हे एक हेल्दी ड्रायफ्रुट आहे. काजूचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. पदार्थात काजू घालताच, पदार्थाची चव दुपटीने वाढते. काजूमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर मोठ्या प्रमाणात आढळतात.

काजूचा रोजच्या आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. फक्त आरोग्यच नाही तर, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. काजूतील पौष्टीक घटक शरीराला मिळावे यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी काजू खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्स्पर्ट वरुण कत्याल यांनी रिकाम्या पोटी काजू खाण्याचे फायदे सांगितले आहेत(What Time To Eat Cashews Is Healthiest?).

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम

काजूच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते. काजूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. नियमित काजू खाल्ल्याने पचन संस्था निरोगी राहते. यासह पोटाच्या समस्याही कमी होतात. अशा स्थितीत नियमित सकाळी रिकाम्या पोटी ४ ते ५ काजू खाणे हे एक चांगला पर्याय ठरू शकतो.

वजन कमी करायचं म्हणून तातडीने चहा ‘बंदच’ करायला हवा का? चहाला पर्याय काय...

वजन नियंत्रणात ठेवते

वजन कमी करण्यासाठी काजू खूप उपयुक्त ठरू शकते. काजूमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मेटाबॉलिज्म जलद होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी काजू खाल्ल्याने पोट भरलेले वाटते. व दिवसभर भूक लागत नाही. ज्यामुळे आपण उलट - सुलट खाणे टाळतो. अशा स्थितीत छोटी भूक भागवण्यासाठी ४ ते ५ काजू खा.

स्मरणशक्ती वाढते

स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी काजू खूप उपयुक्त ठरू शकते. काजूमध्ये मॅग्नेशियम आढळते, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण करायची आहे, त्यांनी आपल्या आहारात काजूचा समावेश करावा.

१ चमचा मध खाण्याचे ५ फायदे, वजन कमी होण्यापासून मेंदू तेज होण्यापर्यंत गुणकारी मध

हाडे मजबूत होतात

हाडे मजबूत करण्यासाठी काजू खूप उपयुक्त ठरू शकते. काजूमध्ये मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम देखील असते. जे हाडांची कमकुवतपणा दूर करते . नियमित काजूचे सेवन केल्याने हाडांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

Web Title: What Time To Eat Cashews Is Healthiest?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.