Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यातले आजार टाळण्यासाठी खाण्यापिण्याची फक्त 5 पथ्यं पाळा..पावसाळा होईल सुखाचा

पावसाळ्यातले आजार टाळण्यासाठी खाण्यापिण्याची फक्त 5 पथ्यं पाळा..पावसाळा होईल सुखाचा

पावसाळ्यातले आजारपण(diseases in rainy season) अगदी अटळच असतात असं नाही. आजारपणाचा धोका असला तरी हे आजार आपण खाण्यापिण्याची पथ्यं (diet rules for rainy season) पाळून सहज टाळू शकतो. पावसाळ्यात कमजोर होणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीला केंद्रस्थानी ठेवून पावसाळ्यात काय खाणं-पिणं टाळायला हवं (what to avoid in diet in monsoon) हे माहित असणं आवश्यक आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 05:54 PM2022-07-19T17:54:33+5:302022-07-19T18:03:02+5:30

पावसाळ्यातले आजारपण(diseases in rainy season) अगदी अटळच असतात असं नाही. आजारपणाचा धोका असला तरी हे आजार आपण खाण्यापिण्याची पथ्यं (diet rules for rainy season) पाळून सहज टाळू शकतो. पावसाळ्यात कमजोर होणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीला केंद्रस्थानी ठेवून पावसाळ्यात काय खाणं-पिणं टाळायला हवं (what to avoid in diet in monsoon) हे माहित असणं आवश्यक आहे. 

What to avoid in rainy season to reduce risk of diseases? | पावसाळ्यातले आजार टाळण्यासाठी खाण्यापिण्याची फक्त 5 पथ्यं पाळा..पावसाळा होईल सुखाचा

पावसाळ्यातले आजार टाळण्यासाठी खाण्यापिण्याची फक्त 5 पथ्यं पाळा..पावसाळा होईल सुखाचा

Highlightsपावसाळ्यात पालेभाज्या, हिरव्या भाज्या यावर जिवाणुंची वाढ होते. कच्च्या भाज्या, सॅलड खाल्ल्यानं पचनाचे विकार होतात. फ्रोजन फूडसमुळे पोटात संसर्गाचा धोका वाढतो. 

पावसाळ्यात छान सुखद वातावरण असलं तरी पावसाळा विविध आजार आणि आजारांचा धोका ( diseases in rainy season)  घेऊन येतो. पावसाळ्यातील दमट, ओल्या वातावरणानं निर्माण होणारे जिवाणू रोगप्रतिकारशक्ती कमी होते. पावसाळ्यातले आजारपण अगदी अटळच असतात असं नाही. आजारपणाचा धोका असला तरी हे आजार आपण खाण्यापिण्याची पथ्यं ( diet rules for rainy season) पाळून सहज टाळू शकतो. आयुर्वेद तज्ज्ञ नीतिका कोहली यांनी पावसाळ्यात कमजोर होणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीला केंद्रस्थानी ठेवून पावसाळ्यात काय खाणं-पिणं टाळायला हवं (what to avoid in diet in monsoon) याबाबत माहिती दिली आहे. 

Image: Google

पावसाळ्यात काय टाळावं?

1. पावसाळ्यात पालेभाज्या, कोबी, ब्रोकोली यासारख्या हिरव्या भाज्या खाणं टाळावं. पावसाळ्यात या भाज्या खाल्ल्यानं आरोग्य खराब होतं. पालक, मेथी, पत्ताकोबी, ब्रोकोली यासारख्या भाज्यांमध्ये जिवाणुंची वाढ वेगानं होते. या भाज्या खाल्ल्यानंतर पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

2. कच्च्या भाज्या, सॅलड हे एरवी आरोग्यास फायदेशीर असतं पण पावसाळ्यात मात्र त्रासदायक असतं. पावसाळ्यात कच्च्या भाज्या, सॅलड खाल्ल्यानं पचनासंबंधीच्या समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात कच्च्या भाज्यांवर जिवाणु आणि बुरशीची वाढ आणि प्रसार वेगानं होतो. पावसाळ्यात भाज्या कच्च्या खाण्याऐवजी स्वच्छ धुवून उकडूनच खायला हव्यात. 

Image: Google

3. मश्रुममध्ये ब, ड ही जीवनसत्वं, पोटॅशियम, लोह, तांबं आणि सेलेनियम हे घटक असतात. पण असं असलं तरी पावसाळ्यात मश्रुम खाणं टाळायला हवं. मश्रुम ओलसर जागेत वाढतात. पावसाळ्यात ओलसर जागी जिवाणुंची वाढ होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात मश्रुम खाल्ल्यानं आरोग्य बिघडण्याचा धोका असतो.

4. फ्रोजन फूडस फास्ट कुकींगसाठी उपयोगी असतात. तसेच चवीलाही चांगले असल्यानं फ्रोजन फूडसचा समावेश आहारात वाढला आहे. पण पावसाळ्यात फ्रोजन फूड्समुळे पोटात संसर्ग होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात फ्रोजन फूड्स खाल्ल्याने पचन क्रिया कमजोर होते, शरीरात खनिजांची कमतरता निर्माण होते.  पावसाळ्यात पचनास बाधा आणणारे फ्रिजमधले थंड पेयं पिण्याऐवजी लिंबू पाणी किंवा जलजीरा यासारखी साधी पेयं पिण्यावर भर द्यावा. 

Image: Google

5. पावसाळ्यात बाहेरचं गाड्यावरचं, तसेच हाॅटेल रेस्टाॅरण्टमधले पदार्थ खाणं टाळायला हवेत. पावसाळ्यात खाण्या पिण्याच्या पदार्थांमधून जिवाणुंचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. बाहेरील खाद्य पदार्थ आणि पेयांचं सेवन टायफाॅइड, डायरिया या आजारांना कारणीभूत ठरु शकतं. 

Web Title: What to avoid in rainy season to reduce risk of diseases?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.