सणासुदीला बरेच गोड पदार्थ खाण्यात येतात. अशावेळी एक्स्ट्रा कॅलरीज नकळत घेतल्या जातात. वजन वाढणं तर कधी पोटाचे त्रास यामुळे उद्भवू शकतात. तेलकट किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी केल्यास तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं ते पाहूया. (Health what to do after eating too much oily food 7 ways to get over it in)
गरम पाणी
तेलकट खाल्ल्यानंतर शरीर डिटॉक्स करणं खूप महत्वाचं असतं. यासाठी पाणी पिणं एक उत्तम पर्याय असू शकतो. ८ ते ९ ग्लास पाणी प्यायल्यानं शरीरातील सगळे टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. म्हणूनच तेलकट खाल्यानंतर गरम पाण्याचं सेवन करायला हवं. यामुळे गळा आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी घटण्यास मदत होते.
लिंबू पाणी
दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करा. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. लिंबू मिसळलेलं कोमट पाणी शरीराला खूप लवकर आणि खोलवर डिटॉक्स करते.
पोटाला आराम द्या
तळलेले पदार्थ खाल्यानं पचनक्रियेवर परिणाम होतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित काम करत नाही. डायजेस्टिव सिस्टिम सुधारण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यासाठी पुढचे २ ते ३ दिवस हलकं जेवण घ्या यामुळे तुम्हाला फरक जाणवेल.
चांगली झोप घ्या
शरीर डिटॉक्स करण्यासाठी योग्य झोप घ्या. विशेषतः जड आणि तेलकट अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा खूप झोप लागते. अन्न थोडेसे पचले की पुरेशी झोप येते. यामुळे मूडही चांगली राहण्यास मदत होते.