Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अंगात नुसता आळस भरलाय, काहीच करावंसं वाटत नाही? अनन्या पांडेची ट्रेनर सांगते १ सोपा उपाय

अंगात नुसता आळस भरलाय, काहीच करावंसं वाटत नाही? अनन्या पांडेची ट्रेनर सांगते १ सोपा उपाय

what to do if you are facing low energy problem anshuka parmani's 1 easy solution : आपल्याला कायम आतून फ्रेश वाटावे यासाठी ठोस काहीतरी करण्याची आवश्यकता असते, तो उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2024 04:59 PM2024-10-13T16:59:56+5:302024-10-16T13:55:58+5:30

what to do if you are facing low energy problem anshuka parmani's 1 easy solution : आपल्याला कायम आतून फ्रेश वाटावे यासाठी ठोस काहीतरी करण्याची आवश्यकता असते, तो उपाय..

what to do if you are facing low energy problem anshuka parmani's 1 easy solution : Energy down, too lazy? Anushka Parwani says 1 simple solution, the dullness will go away - you will feel fresh | अंगात नुसता आळस भरलाय, काहीच करावंसं वाटत नाही? अनन्या पांडेची ट्रेनर सांगते १ सोपा उपाय

अंगात नुसता आळस भरलाय, काहीच करावंसं वाटत नाही? अनन्या पांडेची ट्रेनर सांगते १ सोपा उपाय

घर आणि संसार म्हटला की कामातून सुटका नाही असं आपण कायम म्हणतो. सकाळी झोपेतून उठल्यापासून नाश्त्याला काय करायचं, जेवायला काय करायचं याचं चक्र डोक्यात सुरू होतं. साफसफाई, मुलांना वेळ द्यायचा, त्यांच्या क्लासेस-शाळेचे प्लॅनिंग, घरात काय सामान आणायचं अशा एक ना अनेक गोष्टी डोक्यात सुरू असतात. यातच घरातली आजारपणं, सणवार, ऑफीसच्या कामाची टार्गेट आणि डेडलाईन्स हे सगळे सुरू असते. या सगळ्याचा आपल्याला मानसिक आणि शारीरिक थकवा येतो. अनेकदा आपण विकेंड कधी येणार याचीच वाट बघत असतो.  अशाप्रकारे आळस येणे किंवा एनर्जी गेल्यासारखे वाटण्यामागे बरीच कारणे असतात (what to do  if you are facing low energy problem anshuka parmani's 1 easy solution) . 

शरीरावर आणि मनावर आलेली ही मरगळ काढण्यासाठी आपण बाहेर जाण्याचे किंवा आणखी काहीतरी प्लॅन करत राहतो. मात्र त्याने तात्पुरता फरक पडतो आणि परत २ दिवसांनी जैसे थे परिस्थिती निर्माण होते. पण असे होऊ नये आणि आपल्याला कायम आतून फ्रेश वाटावे यासाठी ठोस काहीतरी करण्याची आवश्यकता असते. प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ आणि करीना कपूर, आलिया भट यांना फिटनेसचे धडे देणारी अंशुका परवानी या समस्येवर १ सोपा उपाय सांगते. प्राण मुद्रा ही योगातील एक महत्त्वाची मुद्रा असून ती नियमित केल्यास त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी बरेच फायदे होतात.  

प्राण मुद्रा म्हणजे काय? ती कशी करायची? 

(Image : Google)
(Image : Google)

1. प्राण मुद्रा ही थकवा कमी होण्यासाठी किंवा गेलेली एनर्जी परत येण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. 

2. प्राण मुद्रा म्हणजे करंगळी आणि मरंगळी या दोन्ही बोटांच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावायचे. ही क्रिया दोन्ही हातांची करायची. 

3.  या अवस्थेत श्वसाकडे लक्ष द्यायचे आणि किमान 15 मिनिटे स्तब्ध राहण्याचा प्रयत्न करायचा.

4. ऐकायला हे सोपे वाटत असेल तरी लक्ष केंद्रित करणे आणि एका अवस्थेत 10-15 मिनिटे थांबणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. 

5. एकदा ही क्रिया करायला जमली की आपोआप आपला थकवा आणि आळस निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

6. ही क्रिया दररोज केल्यास त्याचे जादुई परीणाम दिसून येतात. 

ही मुद्रा करण्याचे फायदे

1. नियमितपणे ही क्रिया केल्याने एनर्जी लेव्हल सुधारण्यास मदत होते.

2. अंगात आलेला आळस निघून जाण्यास याचा चांगला फायदा होतो. 

3. अंगातील गेलेले त्राण परत आणण्यास ही मुद्रा उपयुक्त ठरते.

4. कोणत्याही समस्येचे उपचार सहज होण्यास या क्रियेचा उपयोग होतो. 

5. मानसिक ताण कमी करण्यास याचा सराव फायदेशीर असतो. 

6. शारीरिक संतुलन, मानसिक स्वास्थ्य मिळण्यास आणि शरीराला नवीन ऊर्जा देण्यास हे फायदेशीर असते. 


Web Title: what to do if you are facing low energy problem anshuka parmani's 1 easy solution : Energy down, too lazy? Anushka Parwani says 1 simple solution, the dullness will go away - you will feel fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.