Join us   

तुम्हालाही सतत आणि खूप वेळ उचक्या लागतात? तज्ज्ञ सांगतात, 5 सोपे उपाय, थांबेल उचकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 12:51 PM

What to do If You Have a Hiccups Ayurvedic Remedies by Dr. Nitika Kohli : चकी लागण्याचे ठोस कारण सांगता येत नाही पण ती सुरू होणे, किंवा गायब होणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

ठळक मुद्दे उचकी लागणे व श्‍वास थांबणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली यावर २ सोपे उपाय सांगतात.

उचकी ही सामान्य वाटणारी क्रिया असली तरी ती एकदा लागली आणि थांबत नसली की आपल्याला काही सुधरत नाही. अनेकदा उचकी लागली की ती बराच वेळ येत राहते आणि आपण अस्वस्थ होतो. काही जणांची उचकी पाणी न पिताही जशी येते तशी लगेचच थांबते. अनेकदा दिर्घ श्वास घेत किंवा आणखी काही घरगुती उपाय करत उचकी थांबवण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा बरेच प्रयत्न करुनही ही उचकी थांबत नाही. उचकी लागण्याचे ठोस कारण सांगता येत नाही पण ती सुरू होणे, किंवा गायब होणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. असे मानले जाते की, डायफ्रामची मसल्स अचानक अकुंचन पावल्याने उचकी सारखी स्थिती निर्माण होते (What to do If You Have a Hiccups Ayurvedic Remedies by Dr. Nitika Kohli).

प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली कायम काही ना काही माहिती शेअर करत आपल्या चाहत्यांना आवश्यक अशी माहिती पुरवत असतात. उचकी थांबण्यासाठीचे असेच काही उपाय त्यांनी नुकतेच सुचवले आहेत. पाहूयात हे उपाय काय आहेत.

१. वेलची पावडर आणि कोमट पाणी 

एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा वेलची पावडर घालून ते चांगले उकळायचे. १५ मिनीटांनी ते पाणी गाळून प्यायचे. 

२. साखर 

हा तर पारंपरिक उपाय असल्याने अनेकांना हा उपाय माहित असतो. उचकी लागल्यावर आपण साधारणपणे नुसते पाणी पितो. पण त्यासोबत एखाद चमचा साखर खाल्ली तर सलग लागलेली उचकी थांबू शकते. साखर चावून चावून खाल्ल्यास उचकी थांबण्यासाठी हा उत्तम उपाय असून शकतो.    

३. मिरपूड

मिरपूड घेऊन ती नाकाने आत ओढायची. याचा उचक्या थांबण्यासाठी फायदा होतो. 

४. दही 

उचकी लागल्यावर १ चमचा दही खाणे हाही अतिशय सोपा आणि उपयुक्त उपाय आहे. 

५. आलं

सर्दी-कफ यासाठी उपयुक्त असणारं आलं उचकीसाठीही फायदेशीर असतं. थोडसं आलं चावून चावून खाल्ल्यास उचकी थांबते.

उचकी लागते म्हणजे नेमकं काय होतं?

छातीच्या पिंजऱ्यात विभाजक पडदा (डायफ्रॅम) असतो. तो स्नायूंचा बनलेला असतो. कधी कधी आकस्मिकपणे या स्नायूंचे आकुंचन होते. डायफ्रॅमच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्‍वासनलिकेतून बाहेर टाकली जाण्याची क्रिया होते, परंतु स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ असल्यामुळे मोठ्याने आवाज होतो. प्रत्यक्ष उचकी लागत असताना श्‍वास बाहेर पडत असतो. या वेळात श्‍वास आत घेता येत नाही, त्यामुळे व्यक्तीला अस्वस्थपणा जाणवतो. उचकीमुळे श्‍वास बंद पडण्याची भीती नसते. म्हणजेच उचकी लागणे व श्‍वास थांबणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. मात्र या क्रियेमुळे आपल्याला श्वास थांबतो की काय अशी भिती वाटते पण ही भिती अनाठायीच असते.  पण काही वेळा घरगुती उपायांनी उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा लागतो.   

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपाय