Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कुणाला हार्ट अटॅक आला, तर अशावेळी अवतीभोवतीच्या माणसांनी चटकन काय करायला हवं?

कुणाला हार्ट अटॅक आला, तर अशावेळी अवतीभोवतीच्या माणसांनी चटकन काय करायला हवं?

What to do if you or someone else may be having a heart attack : महिलांनाही हार्ट ॲटॅक येण्याचा धोका वाढतो आहे, त्यामुळेच आणीबाणीच्या वेळी काय करावं हे समजून घ्यायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:06 AM2023-07-19T09:06:00+5:302023-07-19T09:10:02+5:30

What to do if you or someone else may be having a heart attack : महिलांनाही हार्ट ॲटॅक येण्याचा धोका वाढतो आहे, त्यामुळेच आणीबाणीच्या वेळी काय करावं हे समजून घ्यायला हवं.

What to do if you or someone else may be having a heart attack Heart attack first aid Information | कुणाला हार्ट अटॅक आला, तर अशावेळी अवतीभोवतीच्या माणसांनी चटकन काय करायला हवं?

कुणाला हार्ट अटॅक आला, तर अशावेळी अवतीभोवतीच्या माणसांनी चटकन काय करायला हवं?

सध्या लाइफस्टाइल अशी की केवळ पुरुषांनाच नाही तर महिलांनाही हार्ट ॲटॅक चा धोका वाढतो आहे. हार्ट ॲटॅकला सायलेंट किलर असं म्हणतात. युरोपियन हार्ट जर्नल क्वालिटी ऑफ केअर एंण्ड क्लिनिकर आऊटकम्समध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल आणि चुकीच्या डाएटमुळे अनेकांना हार्ट अटॅक येतो. महिला तर स्वत:कडे फारसं लक्षच देत नाही. ना डाएट, ना व्यायाम ना आराम. अशावेळी महिलांनाही हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो आहे. (Heart attack first aid Information)

हार्ट ॲटॅक हृदयाशीसबंधीत एक गंभीर समस्या आहे. सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये तरूणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच या स्थितीला तोंड द्यावे लागते. हार्ट ॲटॅक आल्यानंतर नसांमध्ये ब्लड क्लॉट जास्त होतो आणि यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा व्यसव्थित होत नाही.  जेव्हा हृदय रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित करू शकत नाही तेव्हा रुग्णाचा मृत्यू होतो. या आजाराची जास्त लक्षणंही दिसून येत नाही. म्हणून याला सायलेंट किलर असं म्हणतात. (Learn first aid for someone who may be having a heart attack)

मेयो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार हार्ट ॲटॅकच्या आधी सहसा छातीत दुखते जे 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते. काही लोकांना छातीत हलके दुखते, तर काहींना जास्त-तीव्र वेदना होतात.  ही अस्वस्थता सहसा छातीत निर्माण होणाऱ्या दाबाशी संबंधित असते. काही लोकांना छातीत दुखत नाही किंवा दाब जाणवत नसतो. यावेळी अचानक हृदयविकाराचा झटका येतो, परंतु अनेकांना काही तास किंवा दिवस आधीच धोक्याची चिन्हे दिसत असतात. (Heart Attack What to Do in an Emergency)

कुणाला अचानक हार्ट ॲटॅक आला तर काय कराल?

डॉक्टर शैस्ता खान यांच्यामते छातीत वेदना जाणवणं, हातपाय सुन्न पडणं. श्वास घ्यायला होणं ही लक्षणं हार्ट ॲटॅक येण्याआधी दिसून येतात. अशावेळी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक्युप्रेशर पॉईंट दाबून ठेवा. मोठ्यानं श्वास घ्या किंवा मोठ्या शिंकण्याचा प्रयत्न करा. यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी वेळ मिळतो आणि हार्ट ॲटॅकपासून बचाव होऊ शकतो. 

१) जेव्हा एखाद्याला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा आपण सर्वप्रथम मेडिकल इमरजंसीला कॉल करणे आवश्यक आहे.

२) रुग्ण बेशुद्ध असल्यास सीपीआर सुरू करा. जर व्यक्ती श्वास घेत नसेल किंवा तुम्हाला नाडी सापडत नसेल, तर आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी कॉल केल्यानंतर रक्त प्रवाह राखण्यासाठी CPR सुरू करा. 

३) निरोगी, संतुलित आहार घ्या (अतिरिक्त चरबी/तेल/मांस टाळा, हिरव्या भाज्या, फळे, काज यांचा समावेश करा. तुमचा रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल नियमित तपासा.

४) नियमित व्यायाम करा.  हृदयविकाराच्या झटक्यामागे लठ्ठपणा हा एक प्रमुख जोखीम घटक आहे.

Web Title: What to do if you or someone else may be having a heart attack Heart attack first aid Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.