श्रावण महिना म्हटलं की सणवार आले, या सणवारासोबत ओघानेच उपवास देखील येतात. श्रावण महिन्यात बहुतेकजण उपवास करतात. कधी श्रावणी सोमवार, शनिवार तर कधी सणांच्या निमित्ताने उपवास होतो. बरेचजण निर्जळी उपवास करतात तसेच काही न खाता फक्त पूर्ण दिवस पाणी पिऊन देखील उपवास करतात. या उपवासाच्या दिवसात आपली प्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती देखील कमी होत असते. यासाठी पचण्यास सोपे असलेले पदार्थ आपल्या आहारात समावेश करणे महत्त्वाचे असते. असे असले तरीही आपण उपवासाच्या दिवशी (What are the best foods to break a fast with?) तळलेले तेलकट, पचायला जड असे पदार्थ खातोच. परंतु उपास करताना आपण आधीच उपाशी असतो, पोटात काही नसते अशावेळी लगेच आपण जर काही जड पदार्थ खाल्ले तर ते पचण्यास त्रास होतो.
उपवासाला केवळ धार्मिकच महत्त्व नाही तर यातून आरोग्याला खूप फायदा होतो म्हणून उपवास केला जातो. शरीर डिटॉक्स होते, पचनसंस्थेसाठीही फायदेशीर असते. पण काही लोक दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी उपवास सोडताना (Foods to avoid when breaking a fast) अशा काही गोष्टी खातात ज्यामुळे फायद्याऐवजी (4 Foods To NEVER Break Your Fast With) नुकसान होऊ शकते. उपवास सोडताना काय खावे आणि काय खाऊ नये हे न्यूट्रिशनिस्ट प्रियंका जयस्वाल यांनी शेअर केले आहे(What To Eat & Avoid When Breaking Your Fast, From A Nutritionist).
उपवास सोडल्यानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजे ?
१. मसालेदार अन्नपदार्थ :- जर आपण दिवसभर उपवास म्ह्णून काहीही खाल्ले नसेल तर उपवास सोडताना भूक लागणे हे सहाजिकच आहे. अशावेळी उपवास सोडताना आपल्याला काहीतरी तिखट,मसालेदार चांगले खावेसे वाटते. अशा परिस्थितीत आपल्यापैकी बरेचजण उपवास सोडल्यानंतर मसालेदार पदार्थ खातात. परंतु असे केल्याने, दिवसभर उपाशी राहून अचानक शरीराला तेलकट आणि मसालेदार अन्न पचवता येत नाही. त्यामुळे पोटदुखी आणि गॅसचा त्रास होतो.
२. आंबट फळे खाऊ नका :- उपवास सोडताना आंबट फळे खाणे टाळावे, त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. लिंबू, संत्री आणि मोसंबी यासारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. त्याऐवजी उपवास सोडताना आपण टरबूज, काकडी, सफरचंद आणि पेरू यांसारखी रसदार आणि चवीला गोड असणारी फळं खाऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...
३. कॉफी व चहा पिऊ नका :- अनेकदा उपवास सोडल्यानंतर लोकांना चहा - कॉफीची तल्लफ लागते. काही लोक तहान शमवण्यासाठी कोल्ड्रिंकही पितात. परंतु उपवास सोडताना चहा, कॉफी, कोल्ड्रिंक शक्यतो पिऊ नये, कारण अचानक रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. आपल्याला गॅस आणि अॅसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याऐवजी आपण ताज्या फळांचा रस, ताक किंवा थंड दूध पिऊ शकता.
४. तेलकट व गोड पदार्थ :- उपवास सोडल्यानंतर, पकोडे, तेलात बनवलेली पिठाची कचोरी, हलवा आणि मिठाई यांसारखे पचायला जड असणारे अन्नपदार्थ पूर्णपणे टाळावे. यामुळे आपल्याला अपचनाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उपवास सोडताना अचानक तेलकट किंवा जड पदार्थ खाल्ल्याने डोकेदुखी, पोटात मळमळणे अशा छोट्या - मोठ्या समस्या होऊ शकतात. आपण दिवसभर उपवास करत असतो आणि अचानक जड अन्नपदार्थ खाल्ल्याने असे अन्न पचायला जास्त वेळ लागतो ज्यामुळे चिडचिड होऊ शकते.
मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...