Join us   

Diabetes and Milk : 'हा' त्रास असलेल्यांनी रात्री चुकूनही दूध पिऊन झोपू नये; तब्येत कधी खराब होईल कळणारही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 11:45 AM

What to Know About Diabetes and Milk : दुधात अनेक पौष्टिक घटक असतात, ज्याचा नाश्त्यामध्ये समावेश केल्यास आरोग्याला अनेक प्रकारे फायदे मिळू शकतात.

ज्यांना दूध प्यायला आवडतं  असे लोक दूध पिण्यासाठी वेळ वगैरे काही पाहत नाहीत. पण आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, वैद्यकशास्त्रात असे मानले जाते की गायीचे दूध पिण्याची योग्य वेळ रात्रीची आहे. कारण वैद्यकीय शास्त्रानुसार, दुधामध्ये झोप आणणारे गुणधर्म असतात त्यामुळे ते सकाळी पिण्याची शिफारस केली जात नाही. जर आपण वैज्ञानिक संशोधनाबद्दल बोललो तर त्याबद्दल कोणतेही विशेष संशोधन दिसून येत नाही. विज्ञानानुसार, तुम्ही दूध कधी प्याल हे तुमच्या आरोग्यावर आणि पचनसंस्थेवर पूर्णपणे अवलंबून असते.  (Diabetes and lactose intolerance patient should not drink milk at night)

सकाळी दूध पिण्याचे फायदे

दुधात अनेक पौष्टिक घटक असतात, ज्याचा नाश्त्यामध्ये समावेश केल्यास आरोग्याला अनेक प्रकारे फायदे मिळू शकतात. उदाहरणार्थ, यामुळे तुमची हाडे मजबूत होतात, त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, प्रथिने, जीवनसत्त्वे असे अनेक पोषक घटक असतात.

केस पांढरे व्हायला सुरूवात झालीये? स्वयंपाकघरातील १ पदार्थ वापरा; म्हातारे होईपर्यंत  राहतील काळेभोर केस

दूध पचायला वेळ लागतो. अशा स्थितीत ज्यांची पचनक्रिया कमजोर आहे, त्यांनी सकाळी दूध प्यायल्यानंतर दिवसभर जड वाटण्याची तक्रार उद्भवू शकते. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायले तर तुमचे पोट रात्रभर भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. आयुर्वेदानुसार रात्री कोमट दूध प्यायल्याने मन शांत राहते आणि शरीराच्या स्नायूंनाही आराम मिळतो.

या लोकांनी दूध  घेणं टाळावं

ज्या लोकांना लॅक्‍टोज इनटॉलरेंस (Lactose Intolerance) दूध पचण्यास त्रास होतो, त्यांनी रात्री दूध पिणे पूर्णपणे टाळावे. इतकेच नाही तर ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी रात्रीच्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच दूध प्यावे.

कधी दूध प्यायला हवं?

आरोग्य तज्ञांच्या मते, दूध कधी पिणे चांगले आहे याचे कोणतेही अचूक उत्तर नाही, परंतु जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा मासंपेशींना मजबूत बनवायचे असतील तर वर्कआउट केल्यानंतर दूध पिणे सर्वोत्तम ठरेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न