भारताचे स्टेपल फूड डाळ आहे. भारताात जास्तीत जास्त लोक डाळीचे सेवन करतात. डाळ एक मुख्य अन्न आहे. ज्यात प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. (Health Tips) शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रोटीन्स फार महत्वाचे असतात. शाकाहारी आणि वेगन लोकांसाठी पोषक तत्वांचा पॉवरहाऊस आहे. अशा स्थितीत जर तुम्ही डाळीचे सेवन करणं सोडलं किंवा महिनाभर डाळ खाल्ली नाही तर शरीरात काय बदल होतील आणि डाळ खाल्ल्याने काय फायदे मिळतात ते समजून घेऊ. (What will happen if you don't eat dal for 1 month)
जेवणात डाळ खाल्ली नाही तर काय होते?
डाळ खाल्ल्याशिवाय शरीरातील डेली प्रोटीन्सची कमतरता भरून निघू शकत नाही. यामुळे तुमच्या मांसपेशी कमकुवत होऊ शकतात. खासकरून असे लोक जे पूर्णपणे शाकाहारी पदार्थांवर अवलंबून असतात. एका महिन्यासाठी तुम्ही डाळ खाणं सोडलं तर शरीरात प्रोटीन्सची कमतरता भासू शकते किंवा पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. डाळीत फायबर्स असतात फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश न केल्यास पचनक्रिया कमकुवत होऊ शकते. डाळीत व्हिटामीन्स, मिनरल्स असतात जे शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
डाळ सोडल्याचा प्रभाव संपूर्ण आहार, जीवनशैली आणि आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकार होऊ शकतो. काही लोक शाकाहारी किंवा व्हेगन खाणं पसंत करतात तर काहीजण प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी नट्स, टोफू, शेंगा यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करतात. अर्धा कप शिजवलेली डाळ खायला हवी. जर तुम्ही डाळ खाणं स्किप केलं तर तुम्हाला प्रोटीन्स, फायबर्ससाठी इतर पदार्थांचा आहारात समावेश करावा लागेल.
चेहरा, मानेवर काळा थर आलाय? प्रियांकाचं ब्युटी सिक्रेट बॉडी स्क्रब चेहऱ्याला लावा, ग्लो येईल
डाळ खाण्याचे फायदे
1) डाळ खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात. डाळ एक प्लांट बेस्ड प्रोटीन आहे ज्यामुळे मांसपेशी मजबूत होतात आणि आरोग्य चांगले राहते फायबर्सही यात असतात. ज्यामुळे पोट हेल्दी राहते. पचनक्रिया चांगली राहते.
चालणं होतं तरी पोट कमी होत नाही? फक्त १० मिनिटं ‘असा’ करा 'पॉवर वॉक'; कमी होईल पाेट
2) डाळीत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटामीन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, आयर्न, फायबर, मॅग्नेशियम, व्हिटामीन्स असतात ज्यामुळे शरीराला भरपूर फायदे मिळतात.
3) डाळीत कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात जे खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढत नाही.
4) कार्बोहायड्रेट्स लेव्हल हाय नसेल तर तुम्ही रेग्युलर डाळीचे सेवन करा. हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट डिसिजचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयाच्या आजारांपासूनही बचाव होतो.
5) जर तुमचं वजन सतत वाढत असेल तर डाळ आवर्जून खा, यात फायबर्स, प्रोटीन्स असल्यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं. याशिवाय कॅलरीज इन्टेक कमी असतो. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोकाही कमी होतो