जगभरातील लोकांच्या दिवसाची सुरूवात चहा आणि कॉफीनं होते. जोपर्यंत एक कप चहा किंवा कॉफी पित नाही तोपर्यंत दिवस उगवल्यासारखं आणि फ्रेश वाटत नाही. (What will happen if you quit caffeine for a month without drinking tea oe coffee) पण अतिप्रमाणात चहा-कॉफी घेणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण त्यात कॅफेन असते. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे शरीराला इंस्टंट एनर्जी मिळते. एक महिन्यासाठी चहा-कॉफी सोडल्यानंतर शरीरात कोणते बदल जाणवतात समजून घेऊया. (Health Benefits of Living Caffeine-Free)
१) ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं
चहा कॉफी प्यायल्यानं थकव्यापासून आराम मिळत असला तरी यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. हे मुळीच योग्य नाही. या पेय पदार्थांमध्ये कॅफेन असते. जर तुम्ही एका महिन्यासाठी चहा किंवा कॉफी घेणं सोडालं तर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि बीपीचा त्रास दूर होण्यास मदत होते.
२) चांगली झोप येते
चहा सोडल्यामुळे झोपेवर चांगला परिणाम होतो. लहान मुलांना खूप चांगली आणि जास्त वेळाची झोप मिळते याचं कारण त्यांच्या आहारात कॅफेन कमी असते. तरूणपणात कॅफेनयुक्त पदार्थांची सवय लागल्यामुळे झोप न येण्याचा त्रास होतो. चहा-कॉफी घेणं सोडल्यानंतर एका आठवड्याच्या आत तुमच्या आरोग्यात चांगला बदल दिसेल. न्युरॉन्स पॉझिटिव्ह प्रतिसाद देतात. कारण चहा-कॉफी प्यायल्यानं झोप उडते.
३) दात चमकदार दिसतील
चहा, कॉफी यांसारखे गरम पदार्थ दातांसाठी नुकसानकार ठरू शकतात. यामुळे फक्त दात कमकुवत होत नाहीत तर रंगावरही परीणाम होतो. जर तुम्ही एका महिन्यासाठी चहा किंवा कॉफी पिणं सोडलं तर दात चमकदार दिसतील आणि नवी चमक दातांवर दिसेल. कॅफेनयुक्त पेयांमुळे दातांच्या इनॅमलचं नुकसान होतं याशिवाय दातांमध्ये झिनझिण्याही येतात.
चहा कसा सोडावा?
डॉक्टर सांगतात की अचानक कोणतीही वस्तू खाणं किंवा पिणं बंद केलं तर शरीराचं नुकसान होऊ शकतं. यामुळे डोकेदुखी, थकवा, मूड स्विंग्स यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला चहाची सवय असेल तर ३ ते ४ कप पिण्याऐवजी २ कप चहा प्या. हळूहळू २ वरून एकच कप चहा प्या. महिन्याभरात तुम्हाला वजनातही फरक जाणवलेला दिसेल.
जर तुम्हाला चहाची सवय सोडता येत नसेल तर यासाठी पर्याय शोधणं सुरू करा. ग्रीन टी, हर्बल टी किंवा इतर हेल्दी पदार्थांचे सेवन करा. हर्बल टी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक घटक असतात, जे चहाची सवय सोडवण्यास मदत करतात. शरीरालाही याचा फायदा होतो. चहाला पर्याय म्हणून तुम्ही जी काही पेय घेत आहात. त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका.