Join us   

पावसाळ्यात त्वचेचे आजार नको, इन्फेक्शनचा त्रास नको ? ‘हे’ खा, त्वचेच्या समस्या राहतील दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2024 8:25 PM

What You Should Eat For Better Health During Rainy Season : पावसाळ्यात होणाऱ्या अनेक स्किन प्रॉब्लेम्सवर एकच सोल्युशन, आजच फॉलो करा हेल्दी डाएट...

प्रत्येक ऋतूनुसार आपल्याला स्किनची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या संसर्गाचा धोका अधिक असतो, म्हणून या ऋतूत स्किनची विशेष (Healthy Diet and Nutrition Plan for This Monsoon) काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो, त्यामुळे चेहरा सारखा स्वच्छ करावा लागतो. पावसाळ्यात आजारांसोबतच त्वचेच्या समस्याही उद्भवतात. या ऋतूत चेहऱ्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर आपल्या चेहऱ्यावर पुरळ, फोड, काळे डाग पडण्याची शक्यता असते. कारण पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेचा परिणाम थेट त्वचेवर होतो. त्यामुळे अनेकजणींना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते(Monsoon Diet Tips).

स्किनच्या या समस्या कमी करण्यासाठी आपण त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम, लोशन लावतो किंवा ब्यूटी ट्रिटमेंट्स करतो. यासोबतच, पावसाळ्यात स्किनचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे देखील खूप गरजेचे आहे. पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी नेमके कोणत्या प्रकारचे डाएट घ्यावे याबद्दल आहारतज्ज्ञ डॉ. सुगीता मुत्रेजा अधिक माहिती देत आहेत(Monsoon Diet What You Should Eat For Better Health During Rainy Season).

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ?  

१. सकाळी उठल्यानंतर :- डॉ. सुगीता मुत्रेजा सांगतात की, पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय ते त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्यावे. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम हे व्हिटॅमिन 'ई' चा चांगला स्रोत आहे. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. 

२. नाश्ता :- पावसाळ्यात नेहमी पचायला हलका असणारा नाश्ता करावा. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नाश्त्यात मूग डाळ चीला, लापशी, ओट्स   असे पदार्थ खाऊ शकता. 

पावसाळ्यात फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या सडून खराब होऊ नये म्हणून ६ उपयुक्त ट्रिक्स...

३. मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट :- पावसाळ्यात आपण सहसा चहा, कॉफी किंवा भजी खाणे पसंत करतो. पण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या ऋतूत फळ आणि भाज्यांचे ज्युस पिणे अधिक फायदेशीर ठरेल. पावसाळ्यात आपण आवळ्याचा रस किंवा काकडीचा रस पिऊ शकता. ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पाण्याची कमतरता दूर होते.

४. दुपारचे जेवण :- पावसाळ्यात दुपारच्या जेवणात डाळ, भात किंवा चपाती, भाजी खाऊ शकता. याचबरोबर आपण जास्त खाणे टाळावे. दुपारच्या जेवणात सॅलडचा समावेश जरूर करावा. सॅलड त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. सॅलड खाऊन लठ्ठपणा नियंत्रणामध्ये ठेवता येतो. याशिवाय त्वचा निरोगी आणि तजेलदार बनते.

५. स्नॅक्स :- पावसाळ्यात आपल्याला समोसे, पिझ्झा इत्यादी चटपटीत पदार्थ स्नॅक्स म्हणून खायला आवडतात. पण फास्ट फूड खाल्ल्याने तुमचे आरोग्य आणि त्वचा दोघांनाही हानी पोहोचते. या ऋतूत तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही भिजवलेल्या भोपळ्याच्या बिया स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. याशिवाय पावसाळ्यात भोपळ्याचे सूप पिणेही खूप फायदेशीर असते. 

६. रात्रीचे जेवण :- रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे. रात्रीच्या जेवणात तुम्ही खिचडी, मूग डाळ चीला किंवा डाळ, भात तसेच चपाती आणि भाजी खाऊ शकता.

फक्त ४ गोष्टींची काळजी घ्या, पावसात कितीही भिजलात तरी तुम्ही आजारी पडणार नाही- एन्जॉय मान्सून...

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स