Join us   

नखं सांगतात आजारांची लक्षणं, तपासा तुमची नखं-पाहा तुम्ही आजारी तर नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2023 1:40 PM

What Your Nails Say About Your Health नेल टेस्ट करुन पाहा, नखांचा बदलता रंग आणि खुणा आजारांचे संकेत देतात.

'नाखून में छिपा है आपके सेहत का राज?' असं जरी लोकं म्हणत असले तरी, खरंच नखांवरून आजार ओळखता येतो का? जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा तपासणीसाठी डॉक्टर नखं चेक करतात. त्वचेपासून ते नखांपर्यंत प्रत्येक अवयव आरोग्याविषयी बरेच काही सांगून जाते. परंतु, नखं आपल्या आरोग्याविषयी काय सांगते हे पाहूयात.

यासंदर्भात, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. नितिका कोहली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी शरीराच्या 4 लक्षणांबद्दल सांगितले आहे, ज्याचा परिणाम नखांवर दिसून येतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''अनेक लोकं आपल्या नखांकडे दुर्लक्ष करतात. परंतु, आयुर्वेदानुसार नखं खराब आरोग्य दर्शवतात. जर तुमची नखं गुलाबी असतील तर, तुमचे आरोग्य उत्तम आहे. जर नखांचा रंग पांढरा असेल तर, शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे, हे दिसून येते''(What Your Nails Say About Your Health).

नखांवर दिसणारी लाईन्स

नखांवर दिसणारी लाईन्स, आपल्या शरीरात पौष्टीक घटकांची कमतरता आहे, हे दर्शवते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहारात बदल करा.

अंगकाठी बारीक पण पोट खूप सुटले? झोप कमी झाल्याचा परिणाम, वाढतोय पोटाचा घेर कारण

आडव्या रेषा

जर नखांवर आडव्या रेषा असतील तर, ही एक गंभीर आजार, संसर्ग किंवा कमतरतेचे लक्षण आहे. यासह जेव्हा मूत्रपिंड किंवा थायरॉईडची समस्या असते तेव्हा नखांवर आडव्या रेषा तयार होतात.

नखावर अर्धचंद्र दिसणे

अनेकदा लोकांच्या नखावर चंद्रासारखे चिन्ह दिसते. किंवा अर्धचंद्र दिसतो. याचा अर्थ असा होतो की तुमची पचनसंस्था कमकुवत झाली आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायला हवी. याशिवाय जर चंद्राचे चिन्ह मोठ्या आकाराचे दिसत असेल तर, पोटाचा त्रास, ॲसिडिटीचा त्रास निर्माण होऊ शकतो.

खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?

जाड पिवळे नखे

पिवळे आणि जाड नखे मधुमेहाचे लक्षण आहेत. मधुमेह असलेल्या लोकांची नखे पिवळी आणि जाड होतात.

पिटिंग नखे

एखाद्याला सोरायसिस असल्यास नखे तुटू शकतात. या आजाराची इतर लक्षणे कोपर, गुडघे आणि टाळूवर देखील दिसून येतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य