घरात लहान मुलं असतील तर त्याचं पडणं-झडणं नेहमीच सुरू असतं. अशावेळी बऱ्याचदा त्यांना मुकामार लागतो. कधी कधी आपण स्वत: किंवा घरातलं कोणीतरी कुठेतरी पडतं.. किंवा चालता चालता काहीतरी लागतं. अशावेळी लागलेला भाग सुजतो, ठणकतो. अशावेळी त्यावर बर्फ लावावा की तो भाग गरम पाण्याच्या पिशवीने किंवा उशीने शेकावा हे समजत नाही. कधी कधी पाठ, कंबर आखडते, दुखते, त्यावेळी काय करावं असा विचार येतोच (home hacks for reducing pain). म्हणूनच आता डॉक्टरांनी दिलेल्या या टिप्स पाहा. (when to use ice and when to use hot bag for pain relief,)
बर्फ किंवा गरम पाण्याच्या पिशवीचा वापर केव्हा करावा?
कोणत्या जखमेवर बर्फ लावावा किंवा कोणती जखम गरम पाण्याच्या उशीने, पिशवीने शेकावी, याविषयीचा व्हिडिओ डॉक्टरांनी cls.health या पेजवर शेअर केला आहे. वेदना खूप जास्त असतील तर डॉक्टरांकडेच जावं. पण तरीही त्याआधी घरातल्या घरात दुखणं थोडं कमी करण्यासाठी उपाय करायचा असेल तर या टिप्स तुमच्या उपयोगी येऊ शकतात.
पावसाळ्यात घरभर उडणाऱ्या माश्यांमुळे वैतागलात? ४ सोपे उपाय- माश्यांना करून टाका छुमंतर
१. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी मुकामार लागून ४८ तासांपेक्षा कमी वेळ झाला असेल तर त्याठिकाणी बर्फ लावावा. त्यापेक्षा जास्त वेळ झाला असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा उशीने शेकावे.
२. शरीराचा एखादा भाग आखडून गेला असेल तर तो भाग गरम पाण्याच्या पिशवीने किंवा उशीने शेकून काढावा.
३. एखादा भाग दुखत असेल तर त्या वेदना कमी करण्यासाठी बर्फ लावा.
४. एखाद्या ठिकाणी आलेली सूज कमी करण्यासाठी त्याठिकाणी बर्फ लावण्याचा उपाय करावा.
कितीही आवरलं तरी घरातला पसारा कमी होतच नाही? ४ गोष्टी करा, घर नेहमीच राहील टापटीप
५. स्नायूंमध्ये वेदना असतील तर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा उशीने शेक द्यावा.
६. अर्थरायटीससारख्या दुखण्यावर गरम पाण्याच्या पिशवीने शेकण्याचा उपायच उत्तम आहे.