Join us   

सकाळी उठल्यावर खूप शिंका येतात- नाक बंद होतं? तज्ज्ञ सांगतात एक सोपा उपाय, करून बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 12:52 PM

Home Remedies for Sneezing, Running Nose: उन्हाळा असो अथवा हिवाळा असो.. काही जणांना हा त्रास १२ महिने होतो. म्हणूनच हा एक घरगुती उपाय करून बघा..

ठळक मुद्दे हा उपाय सलग काही दिवस केल्यास सकाळी उठल्यानंतर येणाऱ्या शिंका, नाक गळणं, नाक बंद होणं असा त्रास कमी होईल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

हिवाळा सुरू असताना सर्दी- शिंका येणे ( Sneezing and Running Nose) असा त्रास काही जणांना सतत होतो. वातावरण थंड असल्याने आणि थंडी सहन न झाल्यामुळे असा त्रास होणं साहजिक आहे. पण त्याउलट काही जणं असेही असतात, ज्यांना कोणत्याही ऋतुमध्ये असा त्रास होतो. सकाळी उठल्या- उठल्या खूप शिंका येतात. नाक गळायला लागतं.. किंवा नाक बंद होतं ( Sneezing and Running Nose in every morning). असा त्रास तुम्हालाही जर सतत होत असेल तर हा एक घरगुती उपाय (Home Remedies) करून बघा.

हा उपाय इन्स्टाग्रामच्या harguruji या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरात अगदी सहज उपलब्ध असणारे ४ पदार्थ वापरण्यात आलेले आहेत.

रक्तदाब नियंत्रित ठेवणारे ५ पदार्थ, तब्येतीला जपायचं तर.... वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

हे पदार्थ एरवीही आपल्या आहारात नेहमीच असतात. फक्त आता औषधी म्हणून आपण ते घेत असल्याने त्याचे थोड्या वेगळ्या पद्धतीने सेवन करायचे आहे. 

 

सकाळी उठल्यावर खूप शिंका येत असल्यास उपाय १. हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला सुंठ, ज्येष्ठमध, हळद आणि मीरे हे ४ पदार्थ लागणार आहेत.

२. हे चारही पदार्थ २०- २० ग्रॅम अशा सारख्या प्रमाणात घ्यावेत आणि त्याची पावडर करावी.

बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत

३. रोज रात्री झोपण्यापुर्वी ५० मिली गरम पाणी घ्यावे.

४. त्या पाण्यात दोन चिमूट पावडर टाकावी. पाणी व्यवस्थित हलवून घ्यावे आणि गरम असतानाच प्यावे.

५. हा उपाय सलग काही दिवस केल्यास सकाळी उठल्यानंतर येणाऱ्या शिंका, नाक गळणं, नाक बंद होणं असा त्रास कमी होईल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडी