Join us

पिरिएड्समध्ये स्तन खूप जड वाटतात? ३ प्रकारच्या ब्रा वापरा, स्तन राहतील सुरक्षित, दिसतील मेंटेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 15:18 IST

Which bra should you wear on your period : तुम्ही पॅडेड ब्रा घालू शकता. यामुळे तुमच्या स्तनांना चांगला आधार मिळेल आणि ड्रेसची फिटिंगही चांगली होईल.

महिन्याचे ते ४ दिवस महिलांसाठी खूपच कठीण असतात. यादरम्यान शरीरात बरेच बदल दिसून येतात तर कधी अस्वस्थ वाटतं. पाळी येण्याआधी कोणत्या अंगावरून पांढरं पाणी जातं तर कोणाचे स्तन जड होतात. छातीच्या आकारात बदल झाल्यानं  लूकसुद्धा बदलतो आणि कपड्यांची फिटींग खास दिसत नाही.(Which bra should you wear on your period) पिरिएड्सदरम्यान स्तन व्यवस्थित राहण्यासाठी कोणत्या प्रकारच्या ब्रा वापरणं योग्य ठरतं ते पाहूया. (How to choose a perfect bra)

पॅडेड ब्रा

तुम्ही पॅडेड ब्रा घालू शकता. यामुळे तुमच्या स्तनालाही चांगला आधार मिळेल आणि ड्रेसची फिटिंगही चांगली होईल. पण हे लक्षात ठेवा की तुम्ही जड किंवा दुहेरी पॅडेड ब्रा घालू नये. असे केल्याने तुम्हाला अस्वस्थता जाणवेल तसेच तुम्हाला स्तनात वेदनाही होऊ शकतात.

स्पोर्ट्स ब्रा

तुम्ही स्पोर्ट्स ब्रा देखील कॅरी करू शकता. यासाठी तुम्ही पॅड असलेली आणि ज्याचे फॅब्रिक मऊ असेल अशी ब्रा निवडावी. जर तुम्हाला पॅड ब्राची गरज नसेल तर तुम्ही साधी प्लेन स्पोर्ट्स ब्रा देखील कॅरी करू शकता. तथापि, ज्यांचे स्तन जड झाले आहेत त्यांनी पॅडेड स्पोर्ट्स ब्रा सोबत ठेवावी.

ओपन पोर्समुळे चेहरा खूपच डल, वयस्कर वाटतोय? १ उपाय, ग्लोईंग, क्लिन चेहरा दिसेल

अनवायर्ड ब्रा

तुम्हाला बाजारात एकापेक्षा जास्त अनवायर्ड ब्रा मिळतील. मासिक पाळीच्या वेळी स्तनांना सूज आल्यावर तुम्ही पूर्ण वायर्ड ब्रा आणि हाफ वायर्ड ब्रा दोन्ही कॅरी करू शकता. या प्रकारच्या ब्रामध्ये तुमचा आउटफिटही चांगला दिसतो आणि तो खूप आरामदायकही असतो.

टॅग्स : स्त्रियांचे आरोग्यमहिला