सध्या भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मधुमेहग्रस्त रुग्णांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. मुख्य म्हणजे त्यांच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल व आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.
आपल्यापैकी बहुतेकांना रोजच्या आहारात गव्हाच्या पिठाच्या चपात्या खायला आवडतात. पण गहू व्यतिरिक्त आपण त्यांना इतर धान्यांच्या चपात्या खायला देऊ शकता. या धान्यांच्या पिठामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. यासंदर्भात, आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी, गव्हाच्या पिठाच्या चपातीव्यतिरीक्त कोणत्या धान्यांच्या पिठाची चपाती आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल, याबाबतीत माहिती दिली आहे(Which chapati is good for diabetes?).
बार्लीची चपाती ठरेल फायदेशीर
बार्ली आणि गहू हे एकसारखेच दिसतात. आपण नियमित गव्हाच्या पिठाच्या चपात्या खातो. पण मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी बार्लीच्या पीठाच्या चपात्या फायदेशीर ठरू शकतात. या पिठामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
जेवल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगल्यासारखं वाटतं? तज्ज्ञ सांगतात, ६ उपाय- पचन सुधारेल लवकर
चणा डाळीच्या पीठाने साखर नियंत्रणात राहील
चणाच्या पिठात खनिजे, जीवनसत्वे, फायबर, प्रथिने, भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. चणाच्या डाळीच्या पिठाची चपाती खाल्ल्याने हृदय, किडनी आणि फुफ्फुसांचे आरोग्यही चांगले राहते. या पीठामुळे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
ज्वारीचे पीठ मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर
अनेक आहारतज्ज्ञ ज्वारीच्या पिठाच्या भाकऱ्या खाण्याचा सल्ला देतात. ज्वारीच्या पिठाची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही. कारण त्यात फायबर, प्रथिने आणि मॅग्नेशियम असते. जे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
वजन कमी करताना अजिबात खाऊ नयेत ५ प्रकारची फळं, उलट परिणाम - वजन वाढते झपाट्याने
नाचणीच्या पिठाची भाकरी ठरेल फायदेशीर
मधुमेहग्रस्त रुग्णांना नाचणीच्या पिठाची भाकरी खाण्याचा सल्ला मिळतो. कारण नाचणी हे फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यात पॉलिफेनॉल, अमीनो ऍसिड आणि खनिजे देखील आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
बाजरीचे पीठ मधुमेह नियंत्रणात ठेवते
ज्या लोकांची रक्तातील साखर जास्त आहे, त्यांना बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला मिळतो. बाजरीच्या पिठात भरपूर फायबर आढळते. जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरते. बाजरीचे पीठ फायबरने समृद्ध आहे. याच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहते.