स्वयंपाकघरात तेलाचा सर्वात जास्त वापर केला जातो. (Cooking Hacks) यामुळे फक्त जेवणाची चव वाढत नाही तर शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्वही मिळतात. बिना तेलाचा स्वंयपाक चवीलाही खास लागत नाही. पण गरजेपेक्षा जास्त तेल खाणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. (Best Oil For Cooking) बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे तेल उपलब्ध असतात. नेमकं कोणतं तेल वापरायचं हे लक्षात येत नाही. काहीजण प्रमाणापेक्षा जास्त तेलाचे सेवन करतात. (Best Oil For Your Health Best And Worst Oil For Anti-Inflammatory Diet)
१) नारळाचे तेल
जास्तीत जास्त घरांमध्ये नारळाच्या तेलाचे सेवन केले जाते. नारळाच्या तेलाने केस मजबूत होतात आणि चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासही मदत होते. नारळाचे तेल आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलाच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहण्यासही मदत होते. प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकत नाही. नारळाच्या तेलात बरेच साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. वडा, इडली, सांभर आणि भाज्यांचे सेवन करा.
२) ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यात हेल्दी फॅट्सस असतात. ज्यामुळे ओव्हर ऑल हेल्थ सुधारण्यास मदत होते. जेवण करण्यासाठी न वापरता इतर कामांसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. सॅलेड किंवा शॅलो फ्राय करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. या तेलातील स्वंयपाक चवीलाही चांगला लागतो.
दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात
३) शेंगदाण्याचे तेल
शेंगदाण्याचे तेल अनेक घरांमध्ये वापरले जाते. यात बरेच गुणधर्म असतात जे तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या तेलात एंटीसेप्टीक, एंटीस्पास्मोडीक गुण असतात. ज्यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात. हिवाळ्यात या तेलाचा जास्तीत जास्त वापर करा. ज्यामुळे शरीर गरम राहते आणि शरीराला उष्णता जाणवत नाही. शेंगदाण्याचे तेल अनेक प्रकारे जसं की तळण्यासाठी, भाजण्यासाठी किंवा मोहन देण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
चोंदलेलं नाक-सुजलेले सायनस आणि खोकलाही होईल कमी, करा ५ उपाय- फुप्फुसांची कार्यक्षमताही वाढेल
४) सुर्यफुलाचे तेल
सुर्यफुलाचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. काही रिपोर्टनुसार सुर्यफुलाच्या तेलातील गुण पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. इतर तेलांच्या तुलनेत हे तेल हलकं असतं. एका संशोधनानुसार सुर्यफुलाच्या तेलातील ओलिक एसिडमुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.