Join us   

बदामच कशाला हवेत, 'या' ५ गोष्टी रोज पाण्यात भिजवून खा; बळकट हाडं - पोलादी होईल शरीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2024 2:58 PM

Which food has equal benefits as almonds? : कोण म्हणतं फक्त बदाम खाल्ल्यानेच मेंदू तल्लख होतो? रोज हे ५ पदार्थ खाऊन पाहा..

पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला खूप ताकद मिळते (Health Tips). परंतु, नियमित बदाम खाणं होत नाही. काहींना बदाम परवडते, तर काहींना बदाम खायला आवडत नाही (Almond). बदमामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फॉस्फरस, प्रोटीन आणि इतर अनेक पोषक घटक असतात (Fitness). यामुळे मेंदू तीक्ष्ण, हृदयाचे आरोग्य निरोगी आणि वजन कमी करण्यासही मदत होते (Brain Power).

पण जर आपल्याला नियमित बदाम खाणं होत नसेल तर, या ५ गोष्टी खा. यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फायबर आणि हेल्दी कार्ब्स मिळतील(Which food has equal benefits as almonds?).

हिरवे मूग

प्रोटीनचा उत्तम सोर्स म्हणजे हिरवे मूग. आपण हिरवे मूग रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी खाऊ शकता. यूएसडीएच्या मते, मोड आलेले हिरवे मूग खाल्ल्याने शरीराला प्रोटीन, कार्ब्स, फोलेट, व्हिटॅमिन बी, आयर्न मिळते. यामुळे शरीरातील थकवा आणि आजारांचा धोकाही कमी होतो.

शेंगदाणे

शेंगदाण्याला गरीबांचा बदामही म्हणतात. शेंगदाणे स्वस्त असून, त्यातून शरीराला बदामाचे सर्व गुण मिळतात. त्यात प्रोटीन, फायबर, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे जवळजवळ सर्व पोषक घटक असतात. हे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी खाऊ शकता.

आजी झालेल्या नीता अंबानी फिटनेससाठी रोज खातात ' हा ' पदार्थ, दिसतात फ्रेश आणि तरुण

चणे

भाजलेले किंवा पाण्यात भिजलेले चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. आपण मोड आलेले चणेही खाऊ शकता. यामध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि आरोग्यदायी कॅलरीज असतात. जे स्नायूंसह हाडे मजबूत करतात.

अक्रोड

बदामापेक्षा मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी अक्रोड फायदेशीर ठरते. त्यात हेल्दी फॅट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते. याशिवाय यात लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. आपण रात्रभर पाण्यात अक्रोड भिजत घालून सकाळी खाऊ शकता.

केळी रोज खाता, पण त्यासोबत 'हे' ४ पदार्थही खाता? पोट बिघडलेच म्हणून समजा

अंजीर

अंजीर आपण पाण्यात भिजत घालून सकाळी खाऊ शकता. यातील फायबर बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार दूर ठेवण्यास मदत करतील. शिवाय अंजीरमधील पौष्टीक घटक शरीरातील स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात. 

टॅग्स : हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्य