Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डोळ्यांना लांबचं धुसर दिसतं? रोज आहारात ५ पदार्थ खा; नजर तीक्ष्ण-डोळ्यांची वाढेल ताकद

डोळ्यांना लांबचं धुसर दिसतं? रोज आहारात ५ पदार्थ खा; नजर तीक्ष्ण-डोळ्यांची वाढेल ताकद

Which Food Is Best For Healthy Eyes (Chashma Hatvnyasathi Upay) : पालकात बीटा कॅरोटीन असते. ल्युटीन डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 01:52 PM2024-08-13T13:52:43+5:302024-08-13T17:44:00+5:30

Which Food Is Best For Healthy Eyes (Chashma Hatvnyasathi Upay) : पालकात बीटा कॅरोटीन असते. ल्युटीन डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

Which Food Is Best For Healthy Eyes : Best Foods For Eyes By Agrawal Eye Hospital | डोळ्यांना लांबचं धुसर दिसतं? रोज आहारात ५ पदार्थ खा; नजर तीक्ष्ण-डोळ्यांची वाढेल ताकद

डोळ्यांना लांबचं धुसर दिसतं? रोज आहारात ५ पदार्थ खा; नजर तीक्ष्ण-डोळ्यांची वाढेल ताकद

फिट राहणं वर्तमान काळात सगळ्यात महत्वाचा विषय बनलं आहे. डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेणं फार महत्वाचे असते. नजर चांगली ठेवण्यासाठी एक निरोगी जीवनशैलीचा असणं फार महत्वाचे आहे. आहारात कार्बोहायड्रेट्स, फॅट्स खनिज, व्हिटामीन, प्रोटीन्स, फायबर्स असायलाच हवेत. (Food For Improve Eye Sight) सुंदर आकर्षक डोळे आणि स्पष्ट दृष्टी ठेवण्यासाठी खनिज आणि व्हिटामीन्सची आवश्यकता असते. आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते ते समजून घेऊया. (Best Foods For Eyes By Agrawal Eye Hospital) अग्रवाल हाय हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही खास पदार्थ खाण्याची शिफारस केली आहे. (Eye Care Tips in Marathi)

पालक

अग्रवाल आय हॉस्पिटलमधील तज्ज्ञ सांगतात की पालकात रायबोफ्लेविन  आणि थायमिन यासोबतच ल्युटिन, बीटा कॅरोटीन, क्लोरोफिलिन आणि जैंथिन यांसारखे पिग्मेंट असतात. पालक डोळे आणि हृदय प्रमाण चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. पालकात बीटा कॅरोटीन असते. ल्युटीन डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. ल्युटीन एक शक्तीशाली एंटी ऑक्सिडेंट आहे ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका टळण्यास मदत होते.

मका

मक्यात ल्युटीन आणि जेक्सैथिन आणि कॅरोटीनाईड असते.  रेटीनाला निळ्या प्रकाशामुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवता येतं. रक्तात कॅरोटीनॉईडचे उच्च स्त मॅक्युलर अपघटन आणि मोतीबिंदू या दोन्हींचा धोका कमी करतो. 

इडलीचं पीठ फुलतचं नाही? तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ मिसळा; साऊथस्टाईल मऊ होतील इडल्या

संत्री

संत्र्यात व्हिटामीन ए आणि  इतर एंटी ऑक्सिडेंट्स असतात. यात अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन, बीटा क्रिप्टोक्सथैंथिन, जेक्सैंथिन, फायबर्स फायटो न्युट्रिएंट्स आणि न्युटिन असते.  हे सर्व फायटो केमिकल्स डोळ्यांसाठी उत्तम ठरतात. 

माथ्यावरचे केस जास्तच पांढरे दिसतात? किचनमधल्या ३ वस्तू केसांना लावा; डाय न लावता काळे होतील केस

ब्रोकोली

ब्रोकोली व्हिटामीन ए चा चांगला स्त्रोत आहे. तुम्ही हिरवी ब्रोकोलीचा वापर करू शकता. सॅलेडमध्ये किंवा भाजीमध्ये तुम्ही ब्रोकोलीचा समावेश करू शकता.  दृष्टी चांगली ठेवण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते. 


रताळे

रताळे उपवासाला खाल्ले जातात. पण उपवासाच्या दिवसांव्यतिरिक्त तुम्ही इतरवेळीही रताळे खाऊ शकता. व्हिटामीन ए, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम, व्हिटामीन  सी, फायबर्स यांसारख्या आवश्यक व्हिटामीन्सचे भंडार आहेत.  रताळ्यांच्या सेवनाने डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि डोळ्यांचा आकारही चांगला राहतो. 

Web Title: Which Food Is Best For Healthy Eyes : Best Foods For Eyes By Agrawal Eye Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.