खराब जीवनशैली आणि तणावामुळे आजकाल टाईप-2 मधुमेहाची समस्या बहुतेक लोकांमध्ये दिसून येत आहे. (How to control sugar level) अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, दरवर्षी 1.5 दशलक्ष लोकांना मधुमेहाचे निदान होते. हा आजार एक प्रकारची आरोग्य स्थिती आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. (Diabetes Control Tips)
हे दोन गोष्टींमुळे होऊ शकते. टाइप 1 मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. तर टाइप २ मधुमेहामध्ये शरीर इन्सुलिनला चांगला प्रतिसाद देत नाही. टाइप-2 मधुमेह हा अनियमित आहार, व्यायामाचा अभाव आणि अनुवांशिक घटकांच्या संयोगातून विकसित होतो. याशिवाय वाढतं वय, झोप न लागणे इत्यादी अनेक कारणे आहेत. हा आजार आढळून आल्यावर जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात. (Bitter gourd juice recipes for diabetics patients to control blood sugar)
कारल्यातील एंटीबायोटीक तत्व
कारले चवीला कडू असले तरी त्यात चारॅटिन आणि मोमोर्डिसिन सारखे घटक असतात. त्यांच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. कारल्यामध्ये आढळणारे सक्रिय पदार्थ चारॅटिन आणि मोमोर्डिसी पेशींच्या रक्तातील रेणूंना उत्तेजित करतात, इन्सुलिन स्राव वाढवतात आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजेन संश्लेषण उत्तेजित करतात. तसेच, ते शरीरातील ग्लुकोजचे शोषण कमी करण्यास मदत करतात.
रिसर्च
2011 मध्ये जर्नल ऑफ एथनी फार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कारल्याचा हायपोग्लाइसेमिक प्रभाव असतो आणि टाइप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये आढळणारे फ्रुक्टोसामाइनची पातळी कमी करते. त्याच वेळी, टाइप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कारल्याच्या रसाचे हायपोग्लायसेमिक परिणाम देखील खूप महत्वाचे आहेत. मात्र कडू चवीमुळे लोक ते पिण्यास टाळाटाळ करतात.
कारल्याचा रस इतका कडू असतो की अनेकांना तो पिण्याची इच्छा होत नाही. कडूपणा दूर करण्यासाठी आपण त्यात इतर फळे आणि भाज्या घालू शकता. ही फळे आणि भाज्या मधुमेहासाठी अनुकूल असाव्यात. यासाठी काकडी, लिंबाचा रस आणि हळद पावडरपेक्षा काहीही चांगले नाही. या गोष्टी कारल्यात मिसळून रस बनवा. या फळे आणि भाज्यांचा समावेश केल्याने त्याचे गुणधर्म तर वाढतीलच शिवाय चवही चांगली लागेल.
काकडीत आढळणारे घटक मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. या भाजीमध्ये विशेष हार्मोन्स असतात, जे स्वादुपिंड इन्सुलिन तयार करण्यासाठी वापरते. याशिवाय, हे मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील कमी होतो.
रोज कितीही आवरलं तरी पसारा कमीच होत नाही? 5 चुका टाळा, घर झटपट होईल चकचकीत, स्वच्छ
सफरचंदाबद्दल सांगायचे तर, मधुमेही रुग्ण नक्कीच त्याचे सेवन करू शकतात. वास्तविक, त्यात फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे शरीर डिटॉक्सिफाय देखील करतात. याशिवाय लिंबू आणि हळदीमध्ये व्हिटॅमिन सीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात.