Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हॉटेलचंच नाही, घरचं खाऊनही वाढतात आजार आणि लठ्ठपणा, खरं नाही वाटत? पाहा व्हायरल व्हिडिओ

हॉटेलचंच नाही, घरचं खाऊनही वाढतात आजार आणि लठ्ठपणा, खरं नाही वाटत? पाहा व्हायरल व्हिडिओ

2 Major Reasons For Obesity And Diabetes: घरात तर आपण स्वच्छतेची, मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जातील याची भरपूर काळजी घेतो, मग असं का होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2023 10:33 AM2023-10-05T10:33:06+5:302023-10-05T10:34:38+5:30

2 Major Reasons For Obesity And Diabetes: घरात तर आपण स्वच्छतेची, मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जातील याची भरपूर काळजी घेतो, मग असं का होतं?

Which packet food is dangerous for health? Side effects of constantly eating processed food, 2 major reasons for obesity and diabetes | हॉटेलचंच नाही, घरचं खाऊनही वाढतात आजार आणि लठ्ठपणा, खरं नाही वाटत? पाहा व्हायरल व्हिडिओ

हॉटेलचंच नाही, घरचं खाऊनही वाढतात आजार आणि लठ्ठपणा, खरं नाही वाटत? पाहा व्हायरल व्हिडिओ

Highlightsबाहेरच्या देशांच्या तुलनेत आपण तर घरचं जेवण जास्त करतो. मग तरीही आपल्याकडे आजारांची संख्या का वाढते आहे?

बऱ्याच घरातले लहान मुलं वारंवार आजारी पडतात. मुलांना कमी वयात चष्मा लागत आहे. मुलांमध्ये स्थुलपणा वाढत चालला आहे. एवढंच नाही तर कमी वयात बीपी, शुगर, हृदयविकार असे आजार गाठू लागले आहेत (obesity and diabetes). अगदी पंचविशीतल्या तरुणांचंही हृदय विकाराच्या झटक्याने निधन होत आहे. मधुमेहाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलं जातं. एवढं आपल्याकडे मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे. बाहेरच्या देशांच्या तुलनेत आपण तर घरचं जेवण जास्त करतो. मग तरीही आपल्याकडे आजारांची संख्या का वाढते आहे, या प्रश्नाचा खरोखरच विचार व्हायला हवा (Side effects of constantly eating processed food).... याच प्रश्नाचं नेमकं उत्तर आता आपण जाणून घेऊया..... (Which packet food is dangerous for health?)

 

घरचे पदार्थ किंवा सर्वसामान्य घरात दर महिन्याला आणले जाणारे काही पदार्थ तब्येतीच्या तक्रारी वाढविण्यासाठी कसे कारणीभूत ठरत आहेत, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या foodpharmer या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

साखर खाणे बंद केल्याने खरंच वजन आणि पोट कमी होतं? बघा आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगतात..

यामध्ये त्यांनी जे काही पॅकेट फूड दाखवले आहेत, ते सर्वसामान्य घरांमध्ये अगदी नियमितपणे खाल्ले जातात. एवढंच नाही तर हल्ली आपली किरणा सामानाची यादीही या पदार्थांनीच निम्मी भरलेली असते. George Institute for Global Health यांच्यावतीने जगभरात विकल्या जाणाऱ्या पॅकेट फूडचा अभ्यास करण्यात आला. जवळपास ४ लाख उत्पादनांविषयी त्यात सखोल अभ्यास झाला.

 

 त्या अभ्यासानुसार भारतातलं पॅकेट फूड अतिशय सुमार दर्जाचं आणि तब्येतीसाठी हानिकारक आहे, असा निष्कर्ष काढण्यात  आला आहे.

ओटी पोट खूपच सुटलं? सकाळ- संध्याकाळ २ सोपी योगासने करा, झरझर कमी होतील पोटावरचे टायर्स

कारण त्यापैकी बहुतांश पदार्थांमध्ये साखर, सॅच्युरेटेड फॅट, मैदा आणि पाम ऑईल यांचा भरपूर वापर असतो. हे सगळेच पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहे. घरच्या पदार्थांना हॉटेलसारखी चव यावी, यासाठी आपण वेगवेगळे मसाले, सॉस घरी आणतो. पण ते पदार्थ खरोखरच आरोग्यासाठी चांगले आहेत का, याचा विचार प्रत्येक घरात होणं गरजेचं आहे. 

 

 

Web Title: Which packet food is dangerous for health? Side effects of constantly eating processed food, 2 major reasons for obesity and diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.