बदलत्या जीवनशैलीचा फटका थेट आरोग्यावर होतो (Health Care). अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप यासह इतर कारणांमुळे गंभीर आजार ग्रासतात. मुख्य म्हणजे शरीर बेढप आणि लठ्ठपणामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. ब्लड शुगर, बॅड कोलेस्टेरॉल, मधुमेह यांसारख्या आजारांना लोक सातत्याने बळी पडत आहेत. वजन कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो (White Pepper). पण प्रत्येक उपाय फायदेशीर ठरेलच असे नाही.
जर जिम आणि डाएट करूनही वजन कमी होत नसेल तर, आयुष चिकित्सक डॉ. रास बिहारी तिवारी यांनी सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या मिरीचा आहारात समावेश करून पाहा (Weight Loss Tips). आपण स्वयंपाकात काळी मिरीचा वापर करतो, पण पांढऱ्या मिरीचा कधी वापर करून पाहिलं आहे का? लठ्ठपणा कमी करण्यासाठी पांढऱ्या मिरीचा वापर कसा करावा? पाहा(White Pepper - Health Benefits, Uses and Important Facts).
पांढरी मिरी खाण्याचे फायदे
तज्ज्ञांनुसार, पांढऱ्या मिरीचा वापर वजन कमी करण्यासाठी आपण करू शकता. पांढऱ्या मिरीमध्ये पेपरिन नावाचे तत्व असते, जे चयापचय प्रक्रिया सुधारते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्याची प्रक्रिया सुलभ होते. यासोबतच त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, एनर्जी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक असे अनेक पोषक घटक आढळतात. शिवाय पांढरी मिरी खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर पडतात. ज्याचा फायदा हृदयाला होतो.
सकाळी उठल्यानंतर तहान लागते-चक्करही येते? आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास तर नाही ना?
ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशरही नियंत्रित राहते
पांढऱ्या मिरीचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखर आणि बीपी नियंत्रित राहते. पांढऱ्या मिरीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते आणि इन्शुलीनची क्रियाही वाढते.
उन्हाळ्यात शरीराला गारवा देते कैरी-खोबऱ्याची चटकमटक चटणी; चवीला चटपटीत - करा ५ मिनिटात
- यासोबतच पांढऱ्या मिरीमध्ये फ्लेव्होनॉइड्ससह व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी देखील असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते. इतकंच नाही तर खोकला, सर्दी यासह इतर ऋतूबदलांमुळे होणारे आजार पांढऱ्या मिरीच्या सेवनाने कमी होतात. जर आपल्या पोटाचे विकार किंवा गॅसेसचा त्रास होत असेल तर, आपण उकळत्या पाण्यात पांढरी मिरी घालून पिऊ शकता.