Join us   

खाण्यापिण्याबात WHO नं दिल्या गाईडलाईन्स; तब्येत चांगली ठेवायची तर काय खायचं, काय टाळायचं- पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:54 AM

WHO Food Guidelines According To World Health Organization : जागतिक आरोग्य संघटनेच्या फूड गाईडलाईन्स अनुसार एका वयस्कर व्यक्तीच्या खाण्यापिण्यात फळं, भाज्यांचा समावेस असावा.

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार हेल्दी डाएट घेतल्यानं शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही.  इतकंच नाही तर नॉन कम्युनिकेबल आजार जसं की डायबिटीस, स्ट्रोक आणि हृदयाचे विकारही उद्भवत नाहीत. डाएट चांगलं नसेल आणि व्यक्तीचं लाईफस्टाईल एक्टिव्ह नसेल तर आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO Food Guidelines)

रिपोर्टनुसार काही पदार्थांना आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनवायला हवं तर काही पदार्थ खाणं पूर्णपणे टाळायला हवं.  जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार तुमचं डाएट कसं असावं ते पाहूया. (WHO Food Guidelines According To World Health Organization You Should Eat And Avoid These Food)  

1) जागतिक आरोग्य संघटनेच्या फूड गाईडलाईन्स अनुसार एका वयस्कर व्यक्तीच्या खाण्यापिण्यात फळं, भाज्यांचा समावेश असावा. फळं आणि भाज्या हंगमी  असतील तर त्यांचा आहारात समावेश करा. वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाज्या आहाराचा भाग असायला हवा. दिवसभरात कमीत कमी १ चमचा मीठाचे सेवन करा. तुम्ही ज्या मिठाचे सेवन करता ते आयोडाईज्ड मीठ असायला हवे.

अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? २० रूपयातं ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही

2) खाण्यापिण्यात ट्रांस फॅट्सचा समावेश करू नये. ट्रांस फॅट्स मीट, बेक्ड आणि तळलेले, भाजलेल पदार्थ, आधीच पॅक केलेले पदार्थ, फ्रोजन पिज्जा, कुकीज, बिस्कीट्स, वेफर्स खाणं टाळावं. जे पदार्थ उकळून  खाल्ले जाऊ शकतात ते फ्राय करणं टाळायला हवं.

तूपात पॉलिसॅच्युरेटेड फॅट्सयुक्त तेलाचा वापर केला जातो. जसं की सोयाबीन, कॅनोला, कॉर्न, सुर्यफुलाचे तेल या पदार्थाना आहाराचा भाग बनवू शकता. डॉनट्स, केक्सचे कमी प्रमाणात सेवन करा. गरजेपेक्षा जास्त साखर खाल्ल्याने डायबिटीज आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

डॉक्टर सांगतात, रोज ‘हे’ ५ पदार्थ खा, भराभर वजन घटेल! सुटलेलं पोट होईल कमी

३) शुगर इंटेककडे खास लक्ष द्यायला हवं. कार्बोनेटेड ड्रिंक्स, रेडी टू  ड्रिंक चहा, फ्लेवर्ड मिल्कमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. याशिवाय संक्रमणापासून बचावासाठी लोकांनी साफ-सफाईकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. काही खाद्यपदार्थांना स्पर्श करण्याआधी आणि खाण्याआधी आपले हात स्वच्छ धुवा. किचन फ्लोअरसुद्धा रोज व्यवस्थित साफ करायला हवं.  किचनमध्ये किडे, झुरळ आणि उंदिर नसतील याची काळजी घ्या.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल