Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मजबूत हाडं हवी म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या बिंधास्त खाता? किडनी स्टोन होईल-जीवालाही धोका कारण..

मजबूत हाडं हवी म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या बिंधास्त खाता? किडनी स्टोन होईल-जीवालाही धोका कारण..

Who should not consume calcium rich foods : कॅल्शियमचा भरमसाठ मारा करताय, किडनी गमवाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 04:19 PM2024-10-22T16:19:14+5:302024-10-22T16:20:34+5:30

Who should not consume calcium rich foods : कॅल्शियमचा भरमसाठ मारा करताय, किडनी गमवाल?

Who should not consume calcium rich foods | मजबूत हाडं हवी म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या बिंधास्त खाता? किडनी स्टोन होईल-जीवालाही धोका कारण..

मजबूत हाडं हवी म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या बिंधास्त खाता? किडनी स्टोन होईल-जीवालाही धोका कारण..

कॅल्शियम (Calcium) हे एक असं खनिज आहे, जे हाडं आणि दातांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते (Calcium rich Foods). यासह स्नायूंचे कार्य सुधारण्यासाठी मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यासाठी देखील कार्य करते (Health Tips). शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिससारखे आजार होऊ शकतात. दातही कमी वयात पडतात, किंवा दातांचा त्रास होऊ लागतो. यासह हृदयाचे आजार आणि शरीर थकल्यासारखे आणि अशक्त वाटू लागते.

शरीराचे कार्य चांगले ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे, परंतु काही लोकांसाठी, कॅल्शियम हानिकारक ठरू शकते. कॅल्शियमयुक्त पदार्थ नेमके कुणी खाऊ नये?(Who should not consume calcium rich foods).

किडनी स्टोन

मेयो क्लिनिक या वेबसाईटनुसार, 'कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. किडनी स्टोन तयार होण्यासाठी खनिजांचा वापर होतो. सामान्य प्रकारचा किडनी स्टोन कॅल्शियम ऑक्सलेटपासून बनलेला असतो. अशा परिस्थितीत कॅल्शियमयुक्त जास्त पदार्थ खाऊ नये.

हायपरकॅल्सेमिया

हायपरकॅल्सेमिया ही अशी स्थिती आहे जिथे रक्तामध्ये खूप जास्त कॅल्शियम असते. हायपरक्लेसीमियाच्या लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या, जास्त तहान, वारंवार लघवी होणे ही समस्या निर्माण होते. ही समस्या कायम राहिल्यास, किडनीचे विकारही वाढतात. तुम्हाला हायपरक्लेसीमिया असल्यास किंवा तो होण्याचा धोका असल्यास, कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं टाळा.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

सारकोइडोसिस

सारकोइडोसिस शरीराच्या जवळजवळ कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. हा आजार विशेषतः फुफ्फुस आणि लिम्फ नोड्सवर परिणाम करतो. यामध्ये विशेषतः रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढते. ज्यामुळे हायपरक्लेसीमिया होऊ शकतो. सारकोइडोसिस असलेल्या लोकांनी कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं टाळावे.

फुग्यासारख्या गोलगुबगुबीत झालाय चेहरा? स्वयंपाकघरातले ५ पदार्थ करतील जादू-चेहऱ्यावरची चरबी कमी होईल चटकन

हृदयरोग आणि एथेरोस्क्लेरोसिसग्रस्त रुग्ण

जास्त प्रमाणात कॅल्शियम घेतल्याने एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढू शकतो. ही अशी स्थिती आहे जिथे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होते, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडचण येते. शिवाय नसा कडक होण्याचा धोका वाढतो, अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 

Web Title: Who should not consume calcium rich foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.