सध्याची बदलती लाईफस्टाईल, चुकीच्या आहाराच्या पद्धती, व्यायामाचा अभाव याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. बैठी जीवनशैली धोकादायक असते असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीने असे वातावरण तयार केले आहे जे अधिक बसून आणि कमी हालचाल करण्यास प्रोत्साहन देते. एकाच जागी बसून राहिल्याने आपली शारीरिक हालचाल फारच कमी प्रमाणात होते. परिणामी, बैठ्या जीवनशैलीमुळे स्थूलपणा, मधुमेह, हृदयविकारासारखे आजार होतात. ही बदललेली लाईफस्टाईल आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते.
बल हेल्थ मॅग्जिन लँसेटनं भारतीयां संदर्भातील एक महत्त्वाची माहिती नुकतीच शेअर केली आहे. या माहितीनुसार भारतीयांचा(Lancet study says half of Indians physically unfit) आरोग्याकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन आणि त्यामुळे वाढणाऱ्या चिंतेनं सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. लँसेटच्या अहवालानुसार जवळपास ५० % प्रौढ भारतीय आळसाच्या इतके आहारी गेले आहेत की, दैनंदिन जीवनात त्यांच्याकडून किमान श्रमही केले जात नाहीत. यामध्ये भारतीय महिलांचा आकडा ५७ % असून, या महिला शारीरिकदृष्ट्या पुरेशा सक्रिय नसल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतीत पुरुषांची आकडेवारी तुलनेनं ४२ % इतकी आहे. लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या अहवालात २०३० सालापर्यंत महिलांच्या निष्क्रियतेचा हा आकडा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओच्या (world health organization) मार्गदर्शक तत्त्वांनुसार शारीरिक निष्क्रियतेमुळे महिलांमध्ये मधुमेह, हृदयविकाराचा झटका, स्तनाचा कर्करोग यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढू शकते(Half of Indians Physically Inactive, Women Less Active Than Men).
FOMO मुळे महिला आळशी होत आहेत...
भारतीय महिला सोशल नेटवर्किंग साइटवर खूपच अॅक्टिव्ह झाल्या आहेत. महिलांमध्ये फियर ऑफ मिसिंग आऊट (FOMO) होण्याची भीती वाढत आहे. फियर ऑफ मिसिंग आऊट म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्सवरील त्यांची कोणतीही माहिती बघायची किंवा वाचायची चुकणार नाही याची त्यांना सतत काळजी वाटते.
मनोरंजनाची व्याप्ती बदलली...
फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबपासून ते टीव्ही मालिका आणि वेब सिरीजपर्यंत महिलांच्या मनोरंजनाची व्याप्ती वाढत जात आहे. मनोरंजनाची वेगवेगळी माध्यमे वाढत जात आहे, आणि त्यांचा वापर आपल्याकडून भरपूर प्रमाणात होत आहे. यामुळे आपल्या शारीरिक हालचाली खूपच कमी होत आहेत. भारतीय महिलांमध्ये लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे जी अनेक रोगांचे मूळ आहे.
पुरेशा झोपेचे प्रमाण कमी झाले...
मोबाईलमध्ये मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असल्याने स्क्रीन टाइम वाढत आहे. झोपेच्या वेळी अशा वेगवेगळ्या मनोरंजनाच्या माध्यमांचा वापर केला जातो. झोपेच्या कमतरतेमुळे महिलांना लठ्ठपणा, मधुमेह, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
फिटनेसवर लक्ष केंद्रित करा...
भारतीय महिला फिटनेसबाबत जागरूक नाहीत. जेव्हा लठ्ठपणा खूप वाढतो तेव्हा महिला वजन कमी करण्याचा विचार करतात. यासाठी योगासने, व्यायाम, मॉर्निंग ब्रिस्क वॉक यांसारख्या एक्सरसाइज दररोज किमान एक तास करणे अत्यंत आवश्यक आहे.
सकस आहार महत्त्वाचा आहे...
फिटनेससाठी सकस आहार महत्त्वाचा आहे. स्त्रिया संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतात, परंतु स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्त्रिया त्यांच्या रुटीनमध्ये सकस आहाराचा समावेश करून तंदुरुस्त राहू शकतात.