स्वच्छ आणि चमकदार दात (Teeth Cleaning) कोणाला आवडत नाहीत? पांढरेशुभ्र दात केवळ तुमचे व्यक्तिमत्वच दाखवत नाहीत तर, तुमच्या तोंडाच्या (Oral Health) आरोग्याविषयी देखील सांगतात. बरेच लोक पिवळ्या दातांपासून त्रासलेले असतात. पिवळट दातांमुळे आपल्याला दातांचीही शोभा कमी होते. अनेकदा पिवळट दातांमुळे आपल्याला स्माईलची शोभा कमी होते. दातांचा पिवळटपणा अनेकदा दात घासूनही निघत नाही.
जर पेस्ट आणि ब्रश करूनही दात स्वच्छ होत असतील तर, काही घरगुती उपाय करून पाहा. या घरगुती उपायांमुळे पिवळे पडलेले दात स्वच्छ होतील. यासह दातांच्या अनेक समस्याही दूर होतील. यासाठी आपल्याला डेण्टिस्टकडे जाण्याची गरज नाही. घरगुती उपायांनीही आपण दात स्वच्छ करू शकता(Why are my teeth yellow when i brush them everyday?).
मूग - मटकीला थंडीत मोड येत नाहीत? १ जबरदस्त ट्रिक - मोड येतील लांबसडक
दातांचा पिवळेपणा घरगुती उपायांनी होईल दूर
बेकिंग सोडा
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण टूथपेस्टऐवजी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साइड घेऊन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट ब्रशला लावा. आणि दात स्वच्छ घासून घ्या. मात्र, ते वापरण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होईल.
हिवाळ्यात कान सतत दुखतो? मळ निघतच नाही? ३ गोष्टी करणं टाळा; नाहीतर कानाचा पडदा..
ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर दातांवरील पिवळसरपणा दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी एक कप पाण्यात २ चमचे ऍपल सायडर व्हिनेगर मिसळून माऊथवॉश तयार करा. तयार पाणी तोंडात घेऊन गुळण्या करा. नंतर पेस्ट आणि ब्रशने दात घासून घ्या. आणि पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातांचा पिवळेपणा निघून जाईल.