Join us   

दुपारच्या जेवणात न चुकता खा डाळभात, वजन होईल कमी; हाडं होतील बळकट-तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2024 2:09 PM

Why Dal Chawal is the best meal for health and Weight loss : रोज दुपारी डाळ-भात खाण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?

भारतात जास्तीत जास्त लोकं डाळ-भात खाण्यास पसंती दर्शवतात. कितीही चमचमीत पदार्थ खाल्ले तरी डाळ-भातामुळे पोट भरत नाही. वाफाळलेल्या भातासोबत गरमागरम डाळ तडका खाल्ल्याने पोट भरते, शिवाय मनही तृप्त होते. वजन वाढले की, बरेच जण डाळ-भात (Daal-Chaval) खाणे बंद कर असा सल्ला देतात. पण डाळ-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. शिवाय पोर्शन कण्ट्रोल करून डाळ-भात खाल्ल्याने आरोग्याला फायदाच होतो. डाळीत प्रोटीन, फायबर यासह विविध गुणधर्म असतात (Health Benefits).

शिवाय भातात मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात. ज्याचा सकारात्मक परिणाम आरोग्यावर होतो. पण दुपारच्या जेवणात डाळ-भात खाण्याचे फायदे किती? लंचमध्ये डाळ-भात का खावा? याची माहिती आहारतज्ज्ञ प्रियांका जैस्वाल यांनी दिली आहे(Why Dal Chawal is the best meal for health and Weight loss).

दुपारच्या जेवणात डाळ-भात खाण्याचे फायदे

- तज्ज्ञांच्या मते, डाळ-तांदुळ आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. कारण त्यात अँटिऑक्सिडंट्स, गुड फॅट्स, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई तसेच अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

जरा चालले की दम लागतो? रोज खा आणि प्या ५ पदार्थ, वाढेल ताकद आणि धावू लागाल जोरात

- डाळीमध्ये लाइसीन असते तर, तांदुळात सल्फर बेस्ड अमीनो ॲसिड मेथिओनाइन आणि सिस्टीन असते. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा शरीराला आवश्यक असणारे अमीनो ॲसिड मिळतात.

- डाळ-भात हे हलके अन्न मानले जाते. जे पचायला जड नसून, लवकर पचते. तांदुळात प्रोबायोटिक असते. जे आतड्यांचे आरोग्य मजबूत करते. ज्यामुळे पचनाच्या संबंधित समस्या आपल्याला छळत नाही.

- डाळ-भातामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हे हलके पदार्थ जरी असले तरी, यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय एक वेळ डाळ-भात खाल्ल्याने अनहेल्दी पदार्थ खाण्याची क्रेविंग कमी होते.

खा मेथी व्हा बारीक! हिवाळ्यात मेथी खा भरपूर - पोट होईल कमी आणि वजनही उतरेल

- डाळ-तांदुळ  प्रथिने, कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जे स्नायू तयार करण्यास मदत करतात. यासह हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त ठरतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न