Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डाळ शिजताना त्यावर फेस तयार होतो? आरोग्यासाठी चांगला की वाईट? ठेवावा की फेकून द्यावा?

डाळ शिजताना त्यावर फेस तयार होतो? आरोग्यासाठी चांगला की वाईट? ठेवावा की फेकून द्यावा?

Why Do Lentils Foam When Cooking? And Does It Matter If They Do? : डाळ नेमकी कशात शिजवावी? प्रेशर कुकर की भांड्यात? आरोग्यासाठी काय योग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 11:20 AM2023-11-28T11:20:14+5:302023-11-28T11:25:01+5:30

Why Do Lentils Foam When Cooking? And Does It Matter If They Do? : डाळ नेमकी कशात शिजवावी? प्रेशर कुकर की भांड्यात? आरोग्यासाठी काय योग्य?

Why Do Lentils Foam When Cooking? And Does It Matter If They Do? | डाळ शिजताना त्यावर फेस तयार होतो? आरोग्यासाठी चांगला की वाईट? ठेवावा की फेकून द्यावा?

डाळ शिजताना त्यावर फेस तयार होतो? आरोग्यासाठी चांगला की वाईट? ठेवावा की फेकून द्यावा?

भारतीय थाळीमध्ये डाळींना खूप महत्व आहे. डाळीशिवाय जेवण अपूर्ण आहे. प्रोटीनचा उत्तम सोर्स डाळीला मानले जाते. डाळीचे अनेक प्रकार आहेत. डाळीचे अनेक पदार्थही केले जातात. मात्र, बहुतांश भारतीय घरांमध्ये कोणतीही डाळ असो ती प्रेशर कुकरमध्ये शिजवली जाते. तर काही लोकं भांड्यात डाळ शिजवण्यासाठी ठेवतात. पण डाळ अर्धी शिजल्यानंतर आपण पाहिलं असेल की, डाळीच्या पाण्यावर सफेद रंगाचा फेस तयार होतो.

बहुतांश गृहिणी डाळीवरचा फेस काढून टाकत नाही, ती तशीच डाळीमध्ये राहते. पण डाळीवर साबणासारखा फेस कशामुळे तयार होतो? याचा कधी आपण विचार केला आहे का? डाळीवर तयार झालेला हा फेस आरोग्यासाठी घातक मानले जाते. त्यामुळे डाळीवर साबणासारखा फेस आपल्याला दिसत असेल तर, वेळीच काढून टाका. यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम घडू शकते, याची माहिती न्यूट्रीशन क्लीनिकच्या डॉक्टर सुगीता मुटरेजा यांनी ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटला दिली आहे(Why Do Lentils Foam When Cooking? And Does It Matter If They Do).

डाळ शिजताना त्यावर फेस का तयार होतो?

अनेकदा आपण पाहिलं असेल, डाळीवर फेस तयार होते. हा फेस डाळीतील सॅपोनिन नावाच्या पदार्थामुळे तयार होते. एनसीबीआयवर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, डाळीमध्ये सॅपोनिन्स नावाचे ग्लायकोसाइड्स असतात. जेव्हा ते पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा ते विरघळतात. सॅपोनिन्समध्ये साबणासारखे गुणधर्म असतात, जे उकळल्यावर हवा आत धरून फेस तयार करतात. त्यामुळे डाळ शिजत असताना त्यावर फेस तयार होते.

‘त्याच्या’ प्रेमात झाले होते दिवानी, आईने बोर्डिगला केली रवानगी!- करीना कपूर सांगते एकेकाळचा वेडेपणा..

डाळ शिजताना तयार होणाऱ्या फेसाचे नुकसान

अनेकवेळा आपण अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये डाळ शिजण्यासाठी ठेवतो. बऱ्याचदा भांडी स्वच्छ नसतात, ज्यामुळे डाळ शिजताना त्यावर फेस तयार होते. त्याचे सेवन आरोग्यासाठी सुरक्षित नसून, आरोग्याला नुकसान पोहचू शकते. त्यामुळे अन्न नेहमी लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यात शिजवावे. डाळींमध्ये तयार झालेला पांढरा फेस खाल्ल्याने युरिक अॅसिडची समस्या वाढू शकते.

तोंडाचा ताबा सुटतो? चॉकलेट-आइस्क्रीम खाऊनही वजन कमी होते, व्हॉल्यूमेट्रिक डाएटचा नवा फंडा

डॉ सुगीता मुटरेजा पुढे सांगतात, 'डाळ शिजताना त्यावर तयार झालेला पांढरा फेस काढून टाका. यासाठी डाळ प्रेशर कुकरमध्ये न शिजवता इतर भांडी किंवा कढईत शिजवण्यासाठी ठेवा. जेणेकरुन डाळीला उकळी आल्यानंतर फेसासारखा पदार्थ आपल्याला काढता येईल.'

Web Title: Why Do Lentils Foam When Cooking? And Does It Matter If They Do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.